
आपण असंख्य वेळेला हे "गणपती स्तोत्र" "संकटनाशन स्तोत्र" म्हणतो परंतु यामध्ये उल्लेख केलेल्या गणेशाची प्रत्यक्ष स्थाने आपल्यापैकी
बहुतेकांना माहीत नाहीत....
नारदकृत - 'संकटनाशन' स्तोत्रात उल्लेखिलेली बारा नावे व त्यांची सद्यस्थाने....
प्रथमं वक्रतुण्ड च
एकदन्तं द्वितीयकम् ।
तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं
गजवक्त्रं चतुर्थकम्
लम्बोदरं पंचमं च
षष्ठ विकटमेव च ।
सप्तमं विघ्नराजेन्द्रं
धूम्रवर्णं तथाष्टमम्
नवमं भालचन्द्रं च
दशमं तु विनायकम् ।
एकादशम् गणपति
द्वादशं तु गजाननम्
१. वक्रतुण्ड :- मद्रास राज्यातील कननूरजवळ
२. एकदन्त :- पश्चिम बंगालमध्ये कलकत्त्याजवळ.
३. कृष्णपिंगाक्ष :- मद्रास राज्यातील कन्याकुमारीजवळ.
४. गजवक्त्र :- ओरिसा राज्यात भुवनेश्वर येथे.
५. लंबोदर :- ह्याची दोन स्थाने उल्लेखिली जातात. (१) रत्नागिरी
जिल्ह्यातील गणपती पुळे क्षेत्रात, (२) मध्यप्रदेशातील ओंकारेश्वर या प्रसिद्ध
ज्योतिर्लिंगाजवळ असलेला पंचमुखी गणपती.
६. विकट :- हिमालयाच्या पायथ्याशी हृषीकेश येथे.
७. विघ्नराजेन्द्र :- कुरु क्षेत्रात कौरव-पांढवांच्या युद्धभूमीजवळ.
८. धूम्रवर्णं :- १) दक्षिणेकडील केरळ राज्यात कालिकतजवळ. २) तिबेटमध्ये ल्हासापासून १५ मैलांवर.
९. भालचंद्र :- रामेश्वरजवळ धनुष्कोडी येथे मद्रास राज्य.
१०. विनायक :- काशीक्षेत्रातील अन्नपूर्णामंदिराजवळचा धुण्डिराज गणेश.
११. गणपती :- क्षेत्र गोकर्ण महाबळेश्वर येथील द्विभुज महागणपती.
१२. गजानन :- हिमालयातील शेवटचे तीर्थस्थान पांडुकेसर येथील मुंडकटा गणेश. गौरी कुंडाजवळील ही गणेशमूर्ती शिरविरहित आहे.
समर्थ रामदास स्वामींनी ही बाराही गणेशस्थाने शोधून काढून सर्व गणपतींचे दर्शन घेतले होते, असे म्हणतात. शुभं वास्तू
।। जय श्री गणेश ।।
🙏🙏
Sep 7, 2021
1 min

समर्थ रामदासांची करूणाष्टके
करुणाष्टके’ असं म्हटल्याक्षणी ‘अनुदिन अनुतापे तापलो रामराया’ किंवा ‘दासा मनी आठव विसरेना, तुजवीण रामा मज कंठवेना’ या कवितांचे चरण मनात घोळू लागतात. उपासनेच्या, साधनेच्या काळात पंचवटीच्या रामाच्या सन्मुख उभे असलेले समर्थ डोळ्यासमोर दिसू लागतात; आणि मग रामाच्या भेटीसाठी व्याकूळ झालेला भाव, त्यातून जन्मलेली करुणा आणि त्या करुणाकल्लोळात आकंठ बुडलेले समर्थांचे शब्द सहजपणे आठवू लागतात.
सुरुवातीस एक गोष्ट नमूद करते, करुणाष्टके हे समर्थांनी दिलेले शीर्षक नाही. तसेच, अष्टक या संख्यावाचक किंवा पदवाचक विशेषणाचा या पदांशी तसा काही संबंध नाही.
समर्थांनी जिथे चतु:समासी, पंचमान, एकवीस समासी अशी संख्यावाचक विशेषणे योजिली आहेत, तिथे संख्येचे बंधन पाळले आहे; संख्यावाचक पद प्रथम घेतले आहे. करुणाष्टकात मात्र संख्यावाचक पद दुसरे आहे.
दुसरे असे, एकूण करुणाष्टकांची संख्या आठ आहे असे नाही किंवा प्रत्येकातील पदसंख्या आठ आहे असेही नाही. यामुळे संख्यावाचक म्हणून ‘अष्टक’चा अर्थ घेता येत नाही.
या कवितेने देवाला आळवताना अष्टसात्त्विक भाव जागृत होतात या अर्थाने याला करुणाष्टक असे म्हणता येईल. अष् म्हणजे धावणे अशी एक उपपत्ती देताना ‘अषति इति अष्टकम्’ असे म्हटले आहे. म्हणजे, करुण भावाने देवाकडे केलेला धावा या अर्थाने ही करुणाष्टके आहेत, असंही म्हणता येईल.
थोडक्यात, आठ या संख्येपेक्षा त्यातील भाव अधिक महत्त्वाचा आहे.
करुणाष्टक म्हणजे समर्थांची विशुद्ध भावकविता आहे. मनात दाटून आलेलं अपार कारुण्य ही या कवितेची लेखन प्रेरणा आहे. ज्या प्रभू श्रीरामासाठी सर्वस्व अर्पण केलं, तो राम भेटत नाही या विचाराने मनाची झालेली तळमळ त्यात आहे. व्याकुळता आहे.
‘देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जिवलगांसी तुटी’ या ब्रीदासाठीच बारा-पंधरा वर्षांच्या बालनारायणाने जिवलगांचा, घरादाराचा त्याग केला. अनंत आकाश मोकळं झालं! मागचे सगळे पाश त्याने विचारपूर्वक, प्रयत्नपूर्वक सोडले आणि एकच नातं जोडलं... विश्वात्मक नारायणाशी!
उपासना शोधून पाहिली
ती विश्वपाळिती झाली...
त्याने उपासनेचाही शोध घेतला. कुणाच्या उपदेशाने किंवा अनुमानाने नाही, तर प्रत्यक्ष प्रमाणाने त्या विश्वपालक रामाशी अनुसंधान साधलं. आपल्या वैयक्तिक साधनेचा, उपासनेचा मार्ग निश्चित केला. बद्धावस्था मागे सरली... मुमुक्षुपण सुरू झालं...
पंधरा वर्षांच्या नारायणाचं उपासना पर्व सुरू झालं. कठोर तपश्चर्या, अनुष्ठान, अत्यंत संयत असा दिनक्रम, बलोपासना, वाचन-मनन असा काळ सुरू झाला. ‘विवेके क्रिया आपुली पालटावी’ हे बाल नारायणाला लहान वयात उमगलं होतं.
कठोर साधना सुरू होती. या विवेक, वैराग्यपूर्ण साधनेनंतर राम नक्की भेटेल याविषयी त्याला संशय नव्हता; पण... असं असूनही... कधी तरी त्याचं बालमन खूप कातर होत होतं... अगदी स्वाभाविकपणे...!
आपल्या हातून काहीतरी निसटतं आहे, दुरावतं आहे, रामाशिवाय जिवलग असं दुसरं कोणीही नसताना रामभेटीची आशा अंधुक होते आहे... ही साधकावस्थेतली करुण मनोवस्था त्या बालमनाला व्यापून आहे.
हा आर्त, करुण भाव घेऊन करुणाष्टकं जन्मली. करुण रसाचा स्थायीभाव असणाऱ्या वियोगातून करुणाष्टकं जन्मली. नश्वराच्या प्राप्तीकरिता सगळं जग व्याकुळ असताना, ईश्वराच्या प्राप्तीकरिता व्याकुळ असलेल्या बाल नारायणाच्या मुखातून करुणाष्टकं जन्मली.
म्हणूनच करुणाष्टकं ही समर्थांच्या काव्यशक्तीची आणि भावविश्वाची साक्ष पटवून देणारी कविता ठरली.
करुणाष्टकातून खूप काही उमगतं... पण आज करुणा, अष्टक याबद्दल आणि त्यांच्या जन्मकथेबद्दल सांगून थांबते!
- डॉ. सौ. अपर्णा अजित बेडेकर
(लेखिका संतसाहित्याच्या अभ्यासक आहेत.)
Aug 7, 2021
3 min

आंबा
संपूर्ण भारतभरात सर्वांना प्रिय सर्वत्र प्रसिद्ध असे कोणते फळ असेल तर ते आंबा. आज आपण या आंबा वृक्षाचे महत्त्व बघणार आहोत. याच्या गुणांमुळे आंब्याला 'फळांचा राजा' म्हटले जाते. महाकवी कालिदासापासून अनेक संस्कृत कवी, लेखक, नाटककार यांनी आंब्याचा अतिशय रसिकतेने आपल्या साहित्यात उल्लेख केला आहे. भारतीयांच्या ओठांवर आंबा हे नाव येताच उन्हाळ्याच्या सुट्टीत केलेल्या यथेच्छ आमरस सेवनाच्या गोड आठवणी जाग्या होतात. आंबा हा खूप मोठा वृक्ष नैसर्गिकरीत्या सिक्कीम, आसाम,सातपुडा, सह्याद्री इत्यादी डोंगर पर्वतरांगांमधील जंगलात आढळतो पण पोर्तुगीजांनी त्यांच्याकडील अल्फान्सो या जातीचे कलम येथील कोकण प्रांतात करायला सुरुवात केल्यावर त्याच्या गोड चवीमुळे आपण जास्त करून
कोकणपट्टीत ह्याच कलमी जातीची लागवड करू लागलो. हापूस हे नामकरण सुद्धा केलं. त्यालाच प्रतिष्ठा मिळाली आणि आयुर्वेदात उल्लेखिलेला खरा आंबा हे फळ कमी दर्जाचे ठरले.आज आपण आंब्याच्या अनेक प्रजाती गमावून बसलो आहोत. यामुळे आरोग्याच्या आणि पर्यावरणाच्या दृष्टीने आपले अपरिमित नुकसान होत आहे. स्थानिक प्रजाती नष्ट झाल्यास त्यावर अवलंबून असणाऱ्या सर्व जैववैविध्याला धोका पोहोचून पर्यावरणाची सुदृढता कमी होते म्हणजेच आपल्या भोवतीच्या निसर्गातील उपद्रवी जीवजंतू, किडे, कीटक यांच्यावर नैसर्गिकरीत्या नियंत्रण राखण्यास मोलाची कामगिरी बजावणारे अनेक जीव कमी होतात,नाहीसे होतात मग त्या उपद्रवी जीवांची संख्या वाढून माणसाच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. उत्तम उदाहरण आज-काल वाढलेले अनेक नव्या प्रकारचे रोग व जिवाणू ,विषाणू यांनी घातलेला धुमाकूळ.
स्थानिक हवामान माती,पाणी इत्यादी मुळे आंब्याच्या प्रजाती निर्माण होतात. फळांच्या विविध नैसर्गिक प्रजाती वेगवेगळे पोषण पुरवत असतात ज्यामुळे शरीराची प्रतिकारक क्षमता चांगली राहते. वृद्धावस्था लवकर न येणारे काही घटक या फळांमध्ये नैसर्गिकरित्या असतात जे कलमी आंब्यात नसतात. उन्हाळा या काळात उष्मा वाढल्यामुळे शरीराची शक्ती व पाण्याचे प्रमाण कमी झालेले असते. या काळात देशी प्रजातीचे रायवळ आंबे रसाळ व पौष्टिक गुणांनी या दोन्ही गोष्टींची पूर्तता करतात. सृष्टी मातेने या काळात आपल्याला खोलवरचे पृथ्वीच्या पोटातले पाणी आंबट-गोड स्वरूपात फळांच्या रुपाने देऊन आपल्या तहान व भुकेची सोय केलेली असते. घट्ट गराच्या आंब्याने अंगात उष्णता भरून अनेकदा गळवे,फोड इत्यादी त्रास होतात. शरीराचे संतुलन ढासळते म्हणून प्रत्येक ठिकाणच्या स्थानिक प्रजाती मग त्या गोवंशाच्या असोत की निसर्गातील वृक्षवल्ली, औषधी वनस्पती यांच्या किंवा अन्नधान्य पीक प्रजाती असोत त्यांचे संरक्षण संवर्धन आज आत्यंतिक आवश्यक आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे . दरवर्षी पिकलेल्या देशी आंब्याचे उन्हाळ्यात सेवन केल्यास वर्षभरासाठी भरपूर बल आणि आरोग्यप्राप्ती होते.हे पित्त कमी करते .आंब्याची पोळी उन्हात रस सुकवून करतात. तीसुद्धा पचायला हलकी व पौष्टिक असते. कच्च्या कैरीचे जिरेपूड, मीठ ,साखर घालून सरबत केल्यास घामावाटे बाहेर पडणारे उपयुक्त घटक परत शरीराला मिळतात व तरतरी येते.
आंब्याला आपल्या धार्मिक विधींमध्ये तसेच शुभ प्रसंगी खूप महत्त्व असते. आंब्याचे तोरण मन प्रसन्न करते. त्यासाठी आपण आपल्या घराजवळ आंब्याच्या कोयीपासून छोटी रोपे तयार करायचा प्रयत्न करायला पाहिजे मग ही रोपे आदिवासी भागात वृक्षारोपणासाठी आपण दान करू शकतो.
मुलांनो याच्या स्थानिक प्रजातींची माहिती मिळवून आपल्या परसदारी किंवा शेतात जास्तीत जास्त लावण्याचा प्रयत्न करणार ना?
लिखाण : वैद्या भाग्यश्री विजय टिळक
Jul 25, 2021
6 min

१)
गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः।
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः॥
गुरुर ब्रह्मा – गुरु ब्रह्मा (सृष्टिकर्ता) आहेत.
गुरुर विष्णु – गुरु विष्णु (संरक्षक) आहेत.
गुरुर देवो महेश्वरा – गुरु प्रभु महेश्वर (संहारक )च्या समान आहेत.
(गुरुच उत्पत्ती स्थिती आणि लय या तिन्ही घटनांचे कर्ते आहेत.)
गुरु साक्षात – गुरु प्रत्यक्ष
परब्रह्म – सर्वोच्च ब्रह्म
(गुरुच ह्या सृष्टीतले प्रमुख तत्व आणि संचालक आहेत)
तस्मै – त्यांना अनन्य भावाने
गुरवे नमः – मी नमन करत आहे.
२)
ब्रह्मानन्दं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं
द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्।
एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षीभूतम्
भावातीतं त्रिगुणरहितं सदगुरूं तं नमामि।।
या श्लोकात गुरूंच्या मूळ स्वरूपाचे ,मनोवस्थेचे अप्रतिम वर्णन केलेलं आहे.
गुरू स्वतः ब्रम्हानंद स्वरूप आहेत, समस्त जनांना परम सुख देणारे आहेत . ते स्वतः विज्ञानाची प्रत्यक्ष मूर्तीच आहेत. सर्व प्रकारच्या द्वंद्वांमधून ते पूर्ण मुक्त झाले आहेत. आकाशाप्रमाणे ते अनंत, विशाल आणि निर्लेप आहेत. केवळ तत्त्व रूपातच त्यांना जाणून घेता येतं, अशी ते गूढ विभूती आहेत. ते अनन्य आहेत. नित्य आहेत .अतिशय विमल आहेत. अचल आहेत. निरंतर सर्वसाक्षी रूप आहेत. सर्वसामान्यांच्या कल्पनेच्याही पलीकडे आणि त्रिगुणांच्या ही पलीकडे त्यांचे स्वरूप आहे.
अशा माझ्या सद्गुरूंना मी नमन करत आहे.
Jul 22, 2021
1 min

दीप दर्शन
शुभं करोति कल्याणम् आरोग्यम् धनसंपदा।
शत्रुबुद्धिविनाशाय दीप ज्योति नमोऽस्तु ते।।
दीपो ज्योति परं ब्रह्म दीपो ज्योतिर्जनार्दन:।
दीपो हरतु मे पापं संध्यादीप नमोऽस्तु ते।।
दिव्या दिव्या दिपोत्कार कानीं कुंडलें मोतीहार |
दिव्यला देखून नमस्कार || १ ||
तिळाचे तेल कापसाची वात |
दिवा जळो मध्यान्हरात |
दिवा लावला देवांपाशी |
उजेड पडला तुळशीपाशीं |
माझा नमस्कार सर्व देवांपाशी || २ ||
Jul 1, 2021
54 sec

कडूनिंब
वटवृक्ष, औदुंबर, पिंपळ या वृक्षत्रयीप्रमाणे कडुनिंब हा आपल्या भारतीयांचा अमृतमय ठेवा आहे. वेदकालापासून चरक,सुश्रुत, वाग्भट संहिता, भैषज्य रत्नावली अशा आयुर्वेद विषयक ग्रंथांमध्ये कडुनिंबाचा उल्लेख अनेक ठिकाणी आढळतो. भावप्रकाश निघण्टू, अमरकोष इत्यादी *प्राचीन वनस्पतीविषयक ग्रंथांमध्ये कडुनिंबाच्या गुणधर्मांचे व उपयोगाचे विस्तृत वर्णन मिळते.
सामान्य भारतीय माणसाच्या वापरात हा वृक्ष अनेक प्रकारे आहे. याच्या निरनिराळ्या भागाचा वापर भारतात केला जातो. सामान्य भारतीय माणसाच्या वापरात हा वृक्ष अनेक प्रकारे आहे. याच्या निरनिराळ्या भागाचा वापर भारतात केला जातो.
वर्षप्रतिपदेच्या दिवशी म्हणजेच गुढीपाडव्याला कडुनिंबाची कोवळी पाने,फुले आणून हिंग, जिरे, ओवा, सैंधव, मिरी यासह वाटून त्याचे गुळाबरोबर सेवन केले जाते. यामुळे पुढे येणाऱ्या वसंत ऋतूमधील रोगांचा नायनाट होऊन स्वास्थ्यरक्षण होते. हे विशेषतः देशावर विपुल प्रमाणात आढळत असल्याने तिथे ही प्रथा आहे तर कोकणात कडूनिंबाऐवजी सातवीणीच्या पानांचा रस वरील प्रमाणे अनशापोटी घेतला जातो.
हा आर्द्र प्रदेशात फारसा दिसत नाही कारण याला कोरडी थंड हवा जास्त मानवते. पाणीही कमी लागते.
कडुनिंबाला अरिष्ट असे नाव संस्कृत मध्ये आहे कारण जसा गुढीपाडव्याच्या पवित्र शुभ दिवशी हा दारावर टांगला जातो तसेच घरात अशुभ घडल्यासही कडुनिंबाचे टहाळे दारावर टांगले जाते
Jun 28, 2021
4 min

१
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके।
शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते।।
हा मन्त्र दुर्गासप्तशती मधील आहे.
अर्थ :
हे माते नारायणी,
तू आम्हाला सर्व प्रकारचे मांगल्य प्रदान करणारी स्वतः मंगलमयी शक्ती आहेस, कल्याण करणारी शुद्ध आणि पवित्र अशी शिवानी आहेस, सर्व पुरुषार्थ प्राप्त करून देणारी व सर्व मनोरथ पूर्ण करणारी आहेस.
तू शरणागतवत्सला, त्रिनेत्र ( त्रिकालदर्शी ) धारण करणारी गौरी ( जिचा वर्ण गौर आहे ) आहेस.
हे माते श्री नारायणी ( जिने सर्वाना व्यापले आहे)
मी तुला वंदन करत आहे.
२.
या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।
हा देवी सुक्तातील अतिशय सुंदर आणि प्रभावशाली मंत्र आहे.
अर्थ:
जी देवी सर्व प्राणिमात्रांमध्ये शक्तीचा रूपाने विद्यमान आहे तिला मी नमस्कार करत आहे वारंवार नमस्कार करत आहे.
🌻 भारतीय गुरुकुल परिवार 🌻
Jun 21, 2021
46 sec

निसर्ग साक्षर- देशी वृक्ष संपदा - १
पिंपळ
आपल्या सर्वांना माहीत आहे की अश्वत्थ वृक्ष किंवा पिंपळ हा आपल्या सर्वांच्या संस्कारांमध्ये रुजलेला वृक्ष आहे. भारतभर प्रचंड भाषा, वंश, हवामान, वृक्ष, प्राणी,खाद्यसंस्कृती असे वैविध्य असूनही वड, पिंपळ इत्यादीना सर्वत्र पूजनीय मानले जाते. त्याचे अनेकविध उपयोग केले जातात.
भगवद्गीतेसारख्या धार्मिक ग्रंथांपासून ते चारकसंहितेसारख्या औषधी, आरोग्य इत्यादी साठी निर्माण झालेल्या प्राचीन ग्रंथपरंपरा इत्यादींमध्ये या पिंपळ, वडाचा उल्लेख येतो. बौद्ध धर्मामध्ये मानले जाते कि भगवान बुद्धांना पिंपळाच्या झाडाखाली ध्यानमग्न अवस्थेत असताना ज्ञानप्राप्ती झाली. बुद्ध पौर्णिमेला पिंपळाचे पूजन केले जाते.
आपल्या येथील प्रसिद्ध राजे, चक्रवर्ती सम्राट यांनी वाटसरूंसाठी महामार्गांवर वड पिंपळाचे रोपण करण्याचे आदेश दिलेले जुन्या कागदपत्र, शिलालेख इत्यादी पुराव्यांमध्ये दिसते. त्यामुळे सर्व भारतभर असे अनेक हजारो विशाल वृक्ष आपल्याला आढळतात.
महाराष्ट्रात गणेशोत्सवामध्ये ज्या एकवीस पत्री गणेश पूजनासाठी वापरल्या जातात त्यात एक पिंपळ आहे.
पिंपळ हा वृक्ष कायम भरपूर पानांनी भरलेला असतो. आधुनिक विज्ञानानुसाही हा वृक्ष हवेतून भरपूर कार्बनडायऑक्साईड शोषून ऑक्सिजन सोडतो आणि हवा शुद्ध होते. याच्या शीतल छायेमध्ये म्हणूनच वाटसरूंना ताजेतवाने वाटते.
माणसांएवढाच आनंद हा इतर प्राणी पक्षी किडे कीटक जीवजंतू यांनाही देतो. पिंपळाच्या खांद्यावर लगडलेली छोटी छोटी फळ सदृश फुले ही तर या सर्व जीवसृष्टीचे पोट भरायला समर्थ आहे. म्हणूनच अन्नासाठी माणसांसारखे पैसे मिळवण्याची गरज इतर कोणत्याही जीवाला भासत नाही. जोपर्यंत हे महावृक्ष या पृथ्वीतलावर आहेत, ही जीवसृष्टी येथे सुखाने नांदू शकते.
ग्रंथात वर्णन केले आहे की पिंपळपानावर बुद्धिदेवता वास करते. त्यामुळेच हा वृक्ष आसपास असेल तर मनावर खूप सकारात्मक परिणाम होतो. वातावरणातील नकारात्मक भाव नाहीसे होऊन ते पवित्र, शुद्ध होते.
याच्या पानावर तुपभात जेवल्यास मुलांची बुद्धी तेज होतेच पण वाचादोषही जातात. आयुर्वेदात याला बोधिवृक्ष संबोधतात. तसेच याला स्थिरीवृक्ष असेही संबोधतात.वड उंबर इत्यादी इतर स्थिरीवृक्ष आहेत. आजकाल मनाची चंचलता व उपभोग वृत्ती खूप वाढली आहे. तर या वृक्षांची लाख किंवा चीक ( वड ) किंवा त्यातून वाहणारे पाणी ( उंबर ) हे शरीर व मनाला शांत करू शकते.
आहारविहारातील चुकांमुळे जे गर्भोत्पतिकर भाव बिघडतात त्यांना सुधारून उत्तम संतती हे वृक्ष प्रदान करतात. शरीरावरील रोगाची काळी छाया नाहीशी करून शरीर तेज:पुंज करतात.
पिंपळाची लाख उत्तम टॉनिक आहे. सुका खोकला, दमा, निद्रानाश यावर मुलांना विशेषकरून उपयुक्त आहे. आयुर्वेदातील प्रसिद्ध चंदनबलालाक्षादि तैल हे तर लहान बाळांचा उत्तम शारीरिक मानसिक बौद्धिक विकास घडवण्यासाठी प्रत्येक घरात पाहिजेच.
याच्या छोट्या फांद्या, काड्या दंतमंजनासाठी पूर्वी वापरल्या जात. याने दात दृढ होतात. भारद्वाज ऋषींच्या गोत्रामध्ये पिंपळपानाचा सर्वांगीण उपयोग सांगितला आहे.
वड पिंपळ या झाडांच्या खालची माती ही उपयुक्त जिवाणू नी अत्यंत समृद्ध असते त्यामुळे नैसर्गिक शेती करणारे शेतकरी शेतामध्ये त्याचा विरजण म्हणून वापर करून जमिनीची सुपीकता वाढवू शकतात
असा हा आपला अस्सल देशी वृक्ष पिंपळ .... अश्वत्थ
सौ मोक्षदा शुधान्शु नूलकर, वैद्य भाग्यश्री टिळक
🌻 भारतीय गुरुकुल परिवार 🌻
Jun 18, 2021
5 min

अंघोळ करताना म्हणायचा श्लोक:
गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती |
नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन सन्निधि कुरु ||
अर्थ:
हे पवित्र नद्यांनो,
गंगा,यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा, सिंधु आणि कावेरी,
तुम्ही या पाण्यात प्रवेश करा. ( आणि ह्या अंघोळीच्या पाण्याला तुमच्याप्रमाणे शुद्ध व पवित्र करा.)
Jun 15, 2021
13 sec

सुभाषित – ४
क्षमा शत्रौ च मित्रे च यतीनामेव भूषणम्|
शाम्येत्प्रत्यपकारेण नोपकारेण दुर्जन:||
दुष्ट मित्र आणि शत्रूंना सुद्धा क्षमा करणे ही गोष्ट साधू-संन्यासी यांना शोभा देते. पण सामान्य मनुष्याला ते योग्य नव्हे, कारण दुष्ट मनुष्य हा त्याच्या दुष्कृत्यांचे वाईट परिणाम भोगल्यामुळेच वठणीवर येतो, त्याच्यावर उपकार किंवा क्षमा केल्यामुळे नव्हे.
🌻 भारतीय गुरुकुल परिवार 🌻
Jun 10, 2021
57 sec
Load more
