ज्ञानांगण - dnyananagan संस्कार वर्ग - sanskar varg
ज्ञानांगण - dnyananagan संस्कार वर्ग - sanskar varg
Anjali Takke
गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु - श्लोक - नीरजा करंदीकर - ज्ञानांगण संस्कार वर्ग - NEERJAA KARANDIKAR
1 minutes Posted Jul 22, 2021 at 7:15 pm.
0:00
1:10
Download MP3
Show notes

१)

गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः।

गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः॥ 


गुरुर ब्रह्मा – गुरु ब्रह्मा (सृष्टिकर्ता) आहेत.

गुरुर विष्णु – गुरु विष्णु (संरक्षक)  आहेत.

गुरुर देवो महेश्वरा – गुरु प्रभु महेश्वर (संहारक )च्या समान आहेत.

(गुरुच उत्पत्ती स्थिती आणि लय या तिन्ही घटनांचे कर्ते आहेत.)


गुरु साक्षात – गुरु प्रत्यक्ष

परब्रह्म – सर्वोच्च ब्रह्म 

(गुरुच ह्या सृष्टीतले प्रमुख तत्व आणि संचालक आहेत)


तस्मै – त्यांना अनन्य भावाने

गुरवे नमः – मी नमन करत आहे.


२)

ब्रह्मानन्दं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं


द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्।


एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षीभूतम्


भावातीतं त्रिगुणरहितं सदगुरूं तं नमामि।।


 या श्लोकात गुरूंच्या मूळ स्वरूपाचे ,मनोवस्थेचे अप्रतिम वर्णन केलेलं आहे.

गुरू स्वतः ब्रम्हानंद स्वरूप आहेत, समस्त जनांना परम सुख देणारे आहेत . ते स्वतः विज्ञानाची प्रत्यक्ष मूर्तीच आहेत. सर्व प्रकारच्या द्वंद्वांमधून ते पूर्ण मुक्त झाले आहेत. आकाशाप्रमाणे ते अनंत, विशाल आणि निर्लेप आहेत. केवळ तत्त्व रूपातच त्यांना जाणून घेता येतं, अशी ते गूढ विभूती आहेत. ते अनन्य आहेत. नित्य आहेत .अतिशय विमल आहेत. अचल आहेत. निरंतर सर्वसाक्षी रूप आहेत. सर्वसामान्यांच्या कल्पनेच्याही पलीकडे आणि त्रिगुणांच्या ही पलीकडे त्यांचे स्वरूप आहे.

 अशा माझ्या सद्गुरूंना मी नमन करत आहे.