ज्ञानांगण - dnyananagan संस्कार वर्ग - sanskar varg
ज्ञानांगण - dnyananagan संस्कार वर्ग - sanskar varg
Anjali Takke
कडूनिंब
4 minutes Posted Jun 28, 2021 at 1:15 am.
0:00
4:42
Download MP3
Show notes

कडूनिंब 

       वटवृक्ष, औदुंबर, पिंपळ या वृक्षत्रयीप्रमाणे कडुनिंब हा आपल्या भारतीयांचा अमृतमय ठेवा आहे. वेदकालापासून चरक,सुश्रुत, वाग्भट संहिता, भैषज्य रत्नावली अशा आयुर्वेद विषयक ग्रंथांमध्ये कडुनिंबाचा उल्लेख अनेक ठिकाणी आढळतो. भावप्रकाश निघण्टू,  अमरकोष इत्यादी *प्राचीन वनस्पतीविषयक ग्रंथांमध्ये कडुनिंबाच्या गुणधर्मांचे व उपयोगाचे विस्तृत वर्णन मिळते. 

        सामान्य भारतीय माणसाच्या वापरात हा वृक्ष अनेक प्रकारे आहे. याच्या निरनिराळ्या भागाचा वापर भारतात केला जातो.  सामान्य भारतीय माणसाच्या वापरात हा वृक्ष अनेक प्रकारे आहे. याच्या निरनिराळ्या भागाचा वापर भारतात केला जातो. 

         वर्षप्रतिपदेच्या दिवशी म्हणजेच गुढीपाडव्याला कडुनिंबाची कोवळी पाने,फुले आणून हिंग, जिरे, ओवा, सैंधव, मिरी यासह वाटून त्याचे गुळाबरोबर सेवन केले जाते. यामुळे पुढे येणाऱ्या वसंत ऋतूमधील रोगांचा नायनाट होऊन स्वास्थ्यरक्षण होते. हे विशेषतः देशावर विपुल प्रमाणात आढळत असल्याने तिथे ही प्रथा आहे तर कोकणात कडूनिंबाऐवजी सातवीणीच्या पानांचा रस वरील प्रमाणे अनशापोटी घेतला जातो.

         हा आर्द्र प्रदेशात फारसा दिसत नाही कारण याला कोरडी थंड हवा जास्त मानवते. पाणीही कमी लागते.

        कडुनिंबाला अरिष्ट असे नाव संस्कृत मध्ये आहे कारण जसा गुढीपाडव्याच्या पवित्र शुभ दिवशी हा दारावर टांगला जातो तसेच घरात अशुभ घडल्यासही कडुनिंबाचे टहाळे दारावर टांगले जाते