ज्ञानांगण - dnyananagan संस्कार वर्ग - sanskar varg
ज्ञानांगण - dnyananagan संस्कार वर्ग - sanskar varg
Anjali Takke
सर्व मंगल मांगल्ये - ज्ञानांगण - नीरजा - NEERJA - DNYANANGAN SANSKAR WARG
46 seconds Posted Jun 21, 2021 at 7:02 pm.
0:00
0:46
Download MP3
Show notes

१

सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके।

शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते।।


हा मन्त्र दुर्गासप्तशती मधील आहे.

अर्थ : 

 हे  माते नारायणी,

 तू  आम्हाला सर्व प्रकारचे मांगल्य प्रदान करणारी  स्वतः मंगलमयी शक्ती आहेस, कल्याण करणारी  शुद्ध आणि पवित्र अशी शिवानी आहेस, सर्व पुरुषार्थ प्राप्त करून देणारी  व सर्व मनोरथ पूर्ण करणारी आहेस. 


 तू शरणागतवत्सला,  त्रिनेत्र ( त्रिकालदर्शी ) धारण करणारी  गौरी ( जिचा वर्ण गौर आहे ) आहेस.

हे माते श्री नारायणी ( जिने सर्वाना व्यापले आहे)

मी तुला वंदन करत आहे.

२.


या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता।

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।


हा देवी सुक्तातील अतिशय सुंदर आणि प्रभावशाली मंत्र आहे.


अर्थ:

जी देवी सर्व प्राणिमात्रांमध्ये शक्तीचा रूपाने विद्यमान आहे तिला मी नमस्कार करत आहे वारंवार नमस्कार करत आहे.


🌻 भारतीय गुरुकुल परिवार 🌻