Shet Market
Shet Market
Sakal Media
नमस्कार! तुम्ही ऐकताय ॲग्रोवन डिजिटलचा हा पॉडकास्ट... आतापर्यंत तुम्ही आम्हाला फेसबुक, युट्यूब आणि इन्स्टाग्रामसारख्या आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती व्हिडीओजमध्ये पाहत होता,...आणि म्हणूनच तुमच्या आग्रहास्तव आम्ही सादर करत आहोत अॅग्रोवन डिजिटलचा हा पॉडकास्ट. त्यामुळे इथून पुढेशेती, माती, गाव-शिवार आणि शेतीसंबंधी सर्व बाजारभाव माहिती या सगळ्याची माहिती देखील तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे.चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया.. ॲग्रोवन डिजिटलचा 'शेतमार्केट' पॉडकास्ट.
Soybean Market: पावसामुळे सोयाबीन पिकाची वाढ धीम्या गतीने होत असल्याचा दावा |ॲग्रोवन
 देशात सध्या सोयाबीनचा पेरा गेल्यावर्षीपेक्षा काहीसा घटला आहे. पण सततचा पाऊस आणि कीड-रोगाचा प्रादुर्भाव सोयाबीन पिकावर होत आहे. त्यामुळे सोयाबीन पिकाची उत्पादकता कमी राहू शकते असा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला. तर उद्योगाच्या मते यंदा सोयाबीन बाजारात उशीरा येऊ शकते. पण सोयाबीनला यंदा उशीर का होईल? कोणत्या भागात सोयाबीन पिकाला पावसाचा फटका बसत आहे? याची माहिती आजच्या शेतमार्केट पॉडकास्टमधून मिळेल. The soybean sowing decreased in the country compared to last season till now. But the continuous rain and pest and disease are also affecting the crop. In this situation soybean productivity may be affected. Also in some parts soybean corp may delay this season. But why will this happen? What is the condition of the soybean crop in the country? Watch today's podcast to know the details.
Sep 1, 2022
6 min
Cotton Market: यंदा कापसाची उत्पादकता वाढल्याचा अजब दावा | ॲग्रोवन
 देशात यंदा कापसाची लागवड काही प्रमाणात वाढली. मात्र कापसाला पाऊस आणि कीड-रोगांचा मोठा फटका बसतोय. त्यामुळे उत्पादकता घटण्याचा अंदाज आहे. मात्र पंजाबमधील काॅटन असोसिएशन लिमिटेड या संघटनेने यंदा कापूस उत्पादन २३ टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज व्यक्त केला. या अंदाजात कितपत तथ्य आहे? जाणकारांना याविषयी काय वाटत? कापसाचे दर काय राहतील? जाणून घ्या मार्केट पॉडकास्टमधून.  The cotton sowing increased in the country in the current season. But the cotton crop is suffering from the losses due to the rain and pest and disease. But the industry body from the Punjab has predicted a rise in production by 23 percent. But why is this industry body predicted to increase in production? Is this prediction true? How experts reacted to this? Watch today's Shet Market Podcast to know the details.
Aug 31, 2022
6 min
Tur Market: सरकारने तुरीवर स्टाॅक लिमिट लावल्यावर काय दर राहील? |ॲग्रोवन
सध्या तुरीच्या दरातील तेजी कमी झाली. देशात तुरीचा पुरवठा कमी असतानाही दर कमी झाले. तर चालू हंगामातही तूर उत्पादन घटण्याची शक्यता आहे. मात्र सरकारच्या स्टाॅक लिमिटच्या भीतीमुळं दर दबावात आल्याचं व्यापाऱ्यांंचं म्हणण आहे. मग तुरीला सध्या काय दर मिळत आहे? पुढील काळात दर किती वाढू शकतात? सरकारने स्टाॅक लिमिट लावलं तर दर किती घसरतील? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.  Bullish trend of tur has been down in the country. The tur rate slashed even though demand has increased. On the other hand, production in the current season may decrease. Traders said that the tur rate has a pressure of fear of stock limit. So, what rate is tur getting in the markets? Watch today's Podcast to know the details.
Aug 30, 2022
6 min
Onion Market: बाजारात कांदा आवक घटेल का? |ॲग्रोवन
बाजारात अद्यापही कांद्याचे दर नरमच आहेत.  सध्या मागणीच्या तुलनेत पुरवठा अधिक होत आहे. त्यामुळे कांदा दर घसरल्याचे व्यापारी सांगतात. सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तिहेरी फटका बसत आहे. पण तो कसा? बाजारात कांदा आवक का वाढली? सध्या कांद्याला काय दर मिळत आहे? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. The onion rates are under pressure in the markets. The supply is more than the demand. Traders are saying that due to excess supply rates slashed. In this situation onion producers and farmers are getting a setback. Then what are the onion rates in the markets? Watch today's Podcast to know the details.
Aug 30, 2022
5 min
Chana Market: देशात सध्या हरभरा दर दबावात |ॲग्रोवन
देशात यंदा हरभऱ्याचे विक्रमी उत्पादन झाले. तर नाफेडकडे यंदाची खरेदी आणि मागील शिल्लक असा एकूण ३२ लाख टन साठा असल्याचा अंदाज आहे. नाफेडने खुल्या बाजारात विक्रीही सुरु केली. त्यामुळे बाजारात हरभरा दर दबावात आहेत. सणांच्या काळात हरभऱ्याला मागणी वाढण्याची शक्यता आहे. मग या काळात हरभरा दर सुधारतील का? हरभऱ्याचा बाजारभाव काय राहू शकतो? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. . The country has produced record chana production in the last season. NAFED has approximately 32 lakh tonnes of chana stock including current season procurement and last season. NAFED started selling chana in the open market. Due to NAFED, the chana market is under pressure. Chana demand may increase in the festival season in the coming days. In this situation will the chance rate increase? Watch today's Podcast to know the details.
Aug 27, 2022
6 min
Cotton Market: नवीन कापसालाही चढा दर |ॲग्रोवन
 हरियाणा आणि पंजाबनंतर आता आणखी काही ठिकाणी नवा कापूस बाजारात दाखल झालाय. नवीन कापसालाही जुन्या मालाप्रमाणं दर मिळतोय. देशात कापसाची टंचाई आहे. कापसाची मागणी वाढलीय. त्यामुळे दर तेजीत आहेत. कोण-कोणत्या बाजारात नवीन कापसाची आवक सुरु झालीय? १२ हजार रुपये दर कोणत्या बाजारात मिळाला? कापूस पिकाची स्थिती काय आहे?  The new cotton crop is arriving on some markets in the country. Cotton rates are in a bullish trend in the country, due to cotton shortage and high demand. New cotton is also getting good prices in the market. In which market cotton arrival started? Where cotton is getting 12 thousand rupees rate? Watch today's Shet Market Podcast to know the details.
Aug 27, 2022
6 min
Maize Market: मका पिकावर लष्करी अळीचं आक्रमण वाढलं |ॲग्रोवन
 देशात सध्या मक्याचा दर तेजीत आहे. त्यामुळं लागवडही काही प्रमाणात वाढली. मात्र मका पिकावर काही राज्यांत लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढतोय. तर पावसानंही नुकसान होतंय. त्यामुळं उत्पादकतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मग या काळात मका उत्पादन कसं काहील? मक्याचा भाव वाढेल का? याची माहिती आजच्या पॉडकास्टमधून मिळेल. The corn rates are in a bullish trend in the country. Due to high price maize sowing increased in the current season. But the fall armyworm infestation increased on the crop. Rain also is affecting the crop. In this situation what will be the maize production in the country? What rate will maize get? Watch today's Podcast to know the details.
Aug 25, 2022
6 min
Cotton Market: देशातील कापूस पिकाचं नुकसान वाढलं |ॲग्रोवन
 देशात सध्या कापसाचा तुटवडा असून दर तेजीत आहेत. जुना कापूस सध्या सरासरी १० हजार ७०० रुपयाने विकला जात आहे. तर नवीन कापसालाही १० हजार रुपये दर मिळाला. पण नवीन हंगामात हा दर टिकेल का? कापसाला काय दर मिळू शकतो? देशातील कापूस उत्पादनाची काय स्थिती आहे? याची माहिती आजच्या शेत मार्केट पॉडकास्टमधून मिळेल.  Cotton shortage is a main concern in the country. The old cotton stock is getting 10,700 rupees per quintal rate in the markets. New cotton is also getting 10 thousand rupees. But will this rate continue? What rate will cotton get in the new season? Watch today's Shet Market Podcast to know the details.
Aug 24, 2022
6 min
Tur Market: देशात तुरीची टंचाई कायम राहण्याचा अंदाज |ॲग्रोवन
देशात सध्या तुरीचे दर स्थिरावले. वाढलेल्या दरात तुरीला उठाव मिळत नसल्याने तुरीचे दर एका भावपातळीवर आहेत. पुढील काळात आफ्रिकेतील देशांमधून महिन्याला एक लाख टन तूर आयात होण्याची शक्यता आहे. मग या परिस्थितीत तुरीला काय दर मिळू शकतो? तुरीच्या दरातील तेजी कायम राहील का? याची माहिती आजच्या शेतमार्केट पॉडकास्टमधून मिळेल.  The tur rate stabilized in the country. Tur demand has decreased on the higher prices. That's why tur rates are stable at one price bound. Tur import will start at one lakh tonnes per month in next months. Then what rate will tur get? Will the bullish trend in tur rate continue? Watch today's Shet Market Podcast to know the details.
Aug 23, 2022
6 min
Dalimb Market: पावसामुळं डाळिंबाचे दर दबावात |ॲग्रोवन
 पाऊस आणि बदलत्या वातावरणामुळे डाळिंबाचा दर्जा घसरत आहे. तर बाजारात अपेक्षित मागणीही नाही. त्यामुळे बाजारात दर्जेदार डाळिंबाची आवक कमी असूनही दर घसरले. डाळिंबाचे दर सध्या गेल्यावर्षीपेक्षा किलोमागे ६० रुपयांपर्यंत कमी आहेत. पण डाळिंबाचे दर पुढील काळात सुधारतील का? याची माहिती आजच्या शेतमार्केट पॉडकास्टमधून मिळेल.  The pomegranate quality is decreasing due to the rain and variation in the weather. On the other side demand is low. Due to this situation pomegranate rate is under pressure after arrival down in the market. Will the pomegranate rates increase in the coming days? Watch today's Shet Market Podcast to know the details.
Aug 22, 2022
6 min
Load more