
चाहूल लागताच नव्या पाहुण्याची तो आनंदाने नाचतो
रोज नवीन नवीन स्वप्नांची सांगड घालत असतो
मुलगा झाला तर अस करेन, मुलगी झाली तर तसं करेन म्हणतं असतो.
ते नऊ महिने त्याच्या स्वप्नात त्याचा चेहरा तो बनवत असतो
आतुरता त्याला हि आई एवढीच असते
डोळ्यात पाणी त्याच्याही दाटून येत असते
स्पर्श होता त्याचा तो सर्व दुःख विसरतो
जगण्यासाठी त्याला आता नवा मार्ग मिळतो.
आई ऐवढीच त्यालाही काळजी खूप असते
बाप म्हणून जबाबदारीची जाणीवहि असते
वेळ देता येत नाही म्हणून चीड चीड त्याची होते
भविष्याची त्याच्या तरतूद त्याची चालू असते
अस्तित्व त्याचहि आई एवढेच असते
बाप म्हणून मिरवताना त्याला खूप आवडते
कठोर शद्बातहि त्याच्या माया खूप असते.
कधी बाप तर कधी मित्र म्हणून त्याची ओळख असते .
Jun 18, 2022
1 min

आयुष्य म्हणजे पाणी , प्रवाह मिळेल तसं वाहवत जाणार , कधी न थांबणार.
आयुष्य म्हणजे शाळा , शेवट पर्यन्त शिकत राहायच, प्रत्येक वळणावर परीक्षा देत राहायच.
आयुष्य म्हणजे चांगले तर कधी वाईट अनुभव घेते राहायचे, आणि दुसर्यांनाही देत राहायचे.
आयुष्यावर बोलू काही
प्रवाहाबरोबर वाहवत जाई
कधी शांत तर कधी खळखळ
आयुष्यावर बोलू काही
अशी शाळा ज्याला वर्गच नाही
परीक्षा मात्र रोजच होई
आयुष्यावर बोलू काही
अनुभव याचा खूप निराळा
कधी चेहऱ्यावर हसू येई
कधी अश्रूंची फुले होई
आयुष्यावर बोलू काही.
आयुष्य हे असं जगावं
मेल्यावरही जिवंत राहावं
आयुष्याने पुन्हा म्हणावं
आयुष्यावर बोलू काही, आयुष्यावर बोलू काही.
मला वाटत आयुष्य असं जगावं कि मेल्यावरही जिवंत राहाव.
मिळालेल्या सर्व अनुभवातून शिकून पुढे जाण्याचा प्रयत्न करत राहायचे , कधी कोणाचा अपमान होणार नाही याची काळजी घ्यायची, आपल्याकडे जे आहे त्यातून जमत असेल तर दुसऱ्यांना मदत करायची. प्रवास हा खडतर आहे, आणि तोच कसा सुखकर होईल त्याचा सतत प्रयत्न करत राहायचे .
Jun 18, 2022
1 min

तुला असं काय द्यावं
मनात कायमच कसं राहावं
तुझ्या दिसण्याने मी फुलावं
तुझ्या नसण्याने मी मावळावं
तूला मी म्हणावं माझ्या चंद्र पाखरा
रात्रीने ही सांगावं नाही कुणी तुझ्या सारखा
हृदयाच्या त्या कुपीत तुला असे लपवावे
जसे कस्तुरी मृगाने कस्तुरीला जपावे
तू लांब जरी माझ्या तरी मी तुझीच आहे
मी एकटीच तरीही वाटतं सवराया तूच आहे.
Oct 5, 2021
48 sec

उशीरा का होईना
सांगाव तर लागेल ना
रत्न पारखी त्या डोळ्यांना
बोलावं तर लागेल ना
रिमझीम पडणाऱ्या सरींना
अंगावर हळुवार झेलताना
मनातल्या तुझ्या वादळाना
तूला थांबवाव तर लागेल ना
डोळ्यांना समजलेल्या भावनांना
शेवटी शब्दात मांडाव तर लागेल ना .
Oct 4, 2021
38 sec

थेंब थेंब साचुन डबके भरत होते
डोळ्यातल्या पाण्याचेही असेच काहीसे असते
शब्द शब्द लागून मन भरत असते
अश्रू बनून मग ते डोळ्यातून वाहत असते
हसवणारे प्रवासात हसवून जात असतात
जगण्यासाठी वाटतं तेच क्षण पुरेसे असतात
कणभर आयुष्यात मनभर अपेक्षा असतात
जे प्रवासात एकटं सोडून गेले ते आपले कधीच नसतात
Oct 3, 2021
52 sec

बेधुंद मनाची लहर , लहरींच्या होती लाटा
लाटा या झेलतांना दुःखांना फुटली फाटा
दुःखाच्या या वळणावरती मी नेहमीच एकटी आहे ,
कधी स्वतःला धडपडताना बघत आहे
तर कधी स्वतःच स्वतःला सावरून घेत आहे,
अनुभवाच्या आलेखाने एक गोष्ट शिकवली
भूक लागल्यावर पाण्याने मात्र भूक वीजवली.
आपले म्हणावे असे कोणीच या जगात नसते ,
लहरींच्या या लाटेवरती फक्त फसवे जग वसते .
May 18, 2021
1 min

तुझी साथ मिळावी म्हणून आयुष्य वेचत राहिले
कधी रुसले तर कधी रडले कधी हसले तरी कधी ओरडले
पण तुझ्या पर्यंत मी कधीच नाही पोचले
रुसले तर बोलास हट्टी आहेस
रडले तर बोलास नाटकी आहेस
हसले तर बोलास तुला काळजी नाही
ओरडले तरी बोलास तुला किमत नाही
पण कधीच नाही बोलास त्रास नको करून घेऊस साथ माझी आहे
मी वाट बघत राहिली पण तु बोला नाहीस , मी मात्र त्या वळणावर तशीच उभी आहे.
हेवा वाटतो मला त्या गोडगुलाबी नात्याचा
हसणाऱ्या बागडणाऱ्या त्या जोडप्यांचा
विचारते मी देवाला काय माझं चुकल
जे मनापासून मागितलं तेच हिरावून घेतल
May 18, 2021
1 min
