Show notes
बेधुंद मनाची लहर , लहरींच्या होती लाटा लाटा या झेलतांना दुःखांना फुटली फाटा दुःखाच्या या वळणावरती मी नेहमीच एकटी आहे ,कधी स्वतःला धडपडताना बघत आहे तर कधी स्वतःच स्वतःला सावरून घेत आहे, अनुभवाच्या आलेखाने एक गोष्ट शिकवली भूक लागल्यावर पाण्याने मात्र भूक वीजवली. आपले म्हणावे असे कोणीच या जगात नसते , लहरींच्या या लाटेवरती फक्त फसवे जग वसते .

