Show notes
ज्ञानांगण - संस्कार वर्ग : श्लोक
वेदोक्त महामृत्युंजय मंत्र
इथे आपण वेदोक्त महामृत्युंजय मंत्र न देता पुराणोक्त मंत्र दिला आहे. याचे महत्त्वाचे कारण असे आहे की उपनयन संस्कार म्हणजेच मुंज झाल्याशिवाय वेदोक्त मंत्र कुणीही म्हणू नये, संस्कार झाल्याशिवाय वेदोक्त मंत्र म्हणण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. वेदोक्त मंत्रांमध्ये स्वर असल्याने ते संथा घेतल्याशिवाय कोणीही म्हणू नयेत अन्यथा त्याचा विपरीत परिणाम होऊन दोष प्राप्त होतो. यामुळे इथे आपण नेहमीचा महामृत्युंजय मंत्र देत नाही आहोत.
मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे।
अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः।।
🌻 भारतीय गुरुकुल परिवार🌻

