|| १ ||
सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी।
विद्यारंभम् करिष्यामि प्रसन्ना भव सर्वदा।।
अर्थ:
विद्येची देवी, माता सरस्वती, तुला माझा नमस्कार आहे. वर देणारी माता भगवती सरस्वती ,तुला माझा नमस्कार आहे. आता मी माझ्या विद्याभ्यासाला प्रारंभ करणार आहे .त्याआधी मी तुला नमस्कार करत आहे. ही विद्या प्राप्त होण्यासाठी तू तुझी कृपादृष्टी माझ्यावर सदैव ठेव
।। २ ।।
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता।
या वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना।
या ब्रह्माच्युतशंकरप्रभृतिभिर्देवै:
सदा वंदिता।
सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्याSपहा।।
अर्थ:
जी परमेश्वरी भगवती शाऱदा कुंदाची पुष्पे, चंद्र आणि हिमकणांच्या हारासमान श्वेतवर्णीय आहे ,
जी श्वेता वस्त्रांनी शोभायमान झालेली आहे,
जिच्या हातामध्ये वीणेचा सर्वश्रेष्ठ दंड सुशोभित दिसत आहे,
जी श्वेत रंगाच्या कमळावर पद्मासनात विराजमान झालेली आहे ,
जिची वंदना ब्रम्हा विष्णू आणि महेश सतत करत आहे ,
ती परमेश्वरी सगळ्यांच्या जडत्व प्राप्त झालेल्या बुद्धीचा ( निष्क्रिय व अंधःकारमय) नाश करणारी अशी सरस्वती माता माझं रक्षण करो .
।। ३ ।।
सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी।
विद्यारंभम् करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सर्वदा।।
अर्थ
विद्येची देवी, माता सरस्वती, तुला माझा नमस्कार आहे. वर देणारी माता भगवती सरस्वती ,तुला माझा नमस्कार आहे. आता मी माझ्या विद्याभ्यासाला प्रारंभ करणार आहे .त्याआधी मी तुला नमस्कार करत आहे. कार्यसिद्धीसाठी तू तुझी कृपादृष्टी माझ्यावर सदैव ठेव
।। भारतीय गुरुकुल परिवार ।।

