प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादयासागरा ।
अज्ञानत्व हरोनी बुद्धि मति दे, आराध्य मोरेश्वरा ।
चिंता, क्लेश, दरिद्रय, दुःख अवघे, देशांतरा पाठवी ।
हेरंबा, गणनायका, गजमुखा भक्ता बहू तोषवी ।।
नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे, अत्यंत ते साजिरे |
माथा शेंदूर पाझरे वरी बरे, दुर्वांकुरांचे तुरे ||
माझे चित्त हरे मनोरथ स्फुरे, देखोनि चिंता वरे |
गोसावीसुत वासुदेव कवी रे, त्या मोरयाला स्मरे ||
मोरया मोरया, आम्ही बाळ तान्हे|
तुझीच सेवा करू काय जाणे |
अन्याय माझे कोट्यानुकोटी |
मोरेश्र्वरा बा, तू घाल पोटी ||
मोरया, मोरया गोड हे नाम तुझे |
कृपासागरा हेचि माहेर माझे |
तुझी सोंड बा वाकुडी एकदंता |
मला बुद्धी दे मोरया गुणवंता ||
मोरेश्वरा बा करुणा करावी।
श्री वक्रतुंडा मज बुद्धी द्यावी ।
दारिद्र्य पीडा अवघी हरावी ।
बहुसार विद्या मज शीघ्र द्यावी ।।
थोर गणेश भक्त चिंचवडचे मोरया गोसावी
🌻 भारतीय गुरुकुल परिवार🌻

