Show notes
वैदिक शांती मंत्र
हा मंत्र दोघे, गुरू-शिष्य, बालक-पालक, पती-पत्नी यांच्या एकमेकांच्या साथीने केलेल्या प्रगतीचे, अभ्यासाचे, महत्व सांगतो.
वैदिक शांती मंत्र
ॐ सह नाववतु।
सह नौ भुनक्तु।
सह वीर्यं करवावहै।
तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ।
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥
अर्थ
भगवंत आम्हा गुरू-शिष्य दोघांचे रक्षण करो, आम्हा दोघांचे पोषण करो आम्ही दोघांनीही मोठ्या सामर्थ्याने काम करावे, आम्हा दोघांचेही अध्ययन अगदी तेजस्वी, स्पष्ट, निःसंदिग्ध असावे. आम्ही दोघांनी परस्परांचा द्वेष करू नये. शांती असो, शांती असो, शांती असो. ( अधिभौतिक दुःखांची शांति, आधिदैविक दुःखांची शांति, आध्यात्मिक दुःखांची शांति )

