Show notes
कॅलेंडरवर हिवाळा सुरु झाला, पण अजून महाराष्ट्रात थंडी दिसत नाही. डिसेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान होतं पण आता जानेवारीतही थंडी येणार नसल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. नेमकं असं का होतंय? मागच्या वर्षीचं तापमान नेमकं किती होतं? जानेवारी ते मार्च या थंडीच्या महिन्यांमध्ये नेमका कुठे पाऊस पडेल आणि याचा पिकांवर काय परिणाम होऊ शकतो? पाहुयात सोपी गोष्टच्या या भागात.
लेखन - आशय येडगेनिवेदन - सिद्धनाथ गानूएडिटिंग - अरविंद पारेकर
