Show notes
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्षद्वीप दौऱ्याचे काही फोटो शेअर केले आणि सोशल मीडियावर एका नवीन वादाला तोंड फुटलं आहे. अनेक भारतीयांनी असं ट्विट केलंय की आता मालदीवऐवजी लक्षद्वीपला पर्यटनासाठी जायला हवं. पण मालदीवच्या काही मंत्र्यांनी याला विरोध केला आणि सोशल मीडियावर एक वॉर सुरु झालं. खरंच भारतीय लोकांनी मालदीवचा बहिष्कार केला तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो? पाहुयात सोपी गोष्टच्या या भागात.
लेखन - आशय येडगेनिवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग – शरद बढे

