Show notes
कॉलेजचे दिवस आयुष्यातले बेस्ट दिवस असे म्हणतात. पण अशात काही जणांसाठी कॉलेज हा एक धक्कादायक अनुभव असतो... तो रॅगिंगमुळे.
आता काळ बदललाय तसं रॅगिंगचं स्वरूप आणि व्याख्याही. आज रॅगिंग म्हणजे नेमकं काय? ते फक्त कॉलेजमध्येच होतं का, की शाळेतही होऊ शकतं?आणि तुमच्यासोबत किंवा तुमच्या मुलांसोबत रॅगिंग झाली तर काय करावं? पाहू या सोपी गोष्टमध्ये...वार्तांकन - रवी प्रकाश, बीबीसी हिंदीसाठी
लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकरएडिटिंग - अरविंद पारेकर
