Show notes
जुलै महिन्याच्या मध्यावर चंद्रयान-3 अवकाशात झेपावेल असं इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अर्थात इस्रोनं जाहीर केलं आहे. चंद्रयान-3 हे भारताच्या चांद्र अभियानातलं तिसरं यान आहे.
या मोहिमेत चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचा म्हणजे अलगदपणे यान उतरवण्याचा प्रयत्न केला जाईल. ही मोहीम कशी असेल आणि ती का महत्त्वाची आहे? लेखन, निवेदन – जान्हवी मुळेएडिटिंग – अरविंद पारेकर
