Show notes
गेल्या काही वर्षांमध्ये भारताने, महाराष्ट्राने सातत्याने पूर आणि पुरामुळे होणारं नुकसान पाहिलंय. सरकारी आकडेवारीनुसार देशाच्या एकूण 329 दशलक्ष हेक्टर क्षेत्रफळापैकी 40 दशलक्ष हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र पूरप्रवण आहे. आणि दरवर्षी हे क्षेत्र वाढत चाललंय.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA)नुसार दरवर्षी सरासरी 75 लाख हेक्टर भागात पूर येतो, त्यात सुमारे 1600 जीव गमावले जातात, आणि पिकं, घरं आणि संपत्तीचं नुकसान सरासरी 1805 कोटी रुपयांच्या घरात जातं. आणि अर्थात अनेक ठिकाणी पुरामुळे मृत्यूसुद्धा होऊ शकतात.हे पुरामुळे होणारे मृत्यू आपण कसे टाळू शकतो?जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये.लेखन-निवेदन - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - अरविंद पारेकर
