Show notes
साधारणपणे 1 जूनला मान्सून येणार, असं सांगितलं जातं. पण यंदा तर जूनचे तीन आठवडे उलटून गेल्यावरही मान्सूनचा काही थांगपत्ता नाही. मान्सून यावा आणि त्याने पुरेसं बरसावं, अशी अपेक्षा फक्त शेतकऱ्यांनाच नाही तर भारतीय अर्थव्यवस्थेतल्या सर्वच घटकांना असते. पण का? भारतीय अर्थव्यवस्थेचं आणि मान्सूनचं हे नातं काय आहे? समजून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये.
वार्तांकन – मानसी देशपांडे, बीबीसी मराठीसाठीलेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकरएडिटिंग – अरविंद पारेकर
