Show notes
लॉकडाऊनमध्ये आपल्यापैकी अनेकांनी पायजामे किंवा बॉक्सर्समध्येच घरून कामं केली, मीटिंग्स, प्रेझेंटेशन्स अटेंड केले. पण आता कोरोना मागे पडलाय, ऑफिसेस पूर्णपणे उघडलीयेत आणि म्हणून वर्क फ्रॉम होमचा पर्याय कंपन्या काढून घेतायत.
त्यामुळेच की काय अनेक जण, प्रामुख्याने महिला ऑफिसला दररोज जाण्यापेक्षा नोकरी सोडणं पसंत करताना दिसतायत.असं का होतंय? समजून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये. वार्तांकन – सुशील सिंह, बीबीसी प्रतिनिधीलेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकरएडिटिंग – अरविंद पारेकर
