Show notes
येत्या 15 जूनपर्यंत राज्यातील शाळा सुरू होत आहेत. नवीन दप्तर, नवीन वह्या-पाठ्यपुस्तकं आणि नवीन गणवेश खरेदी करत विद्यार्थी आणि पालकांची तयारी सध्या सुरू आहे. अशावेळी महाराष्ट्र राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने मात्र नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे येत्या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्रातील शाळांमध्ये सर्व विद्यार्थ्यांना एकसारखा गणवेश असेल.
परंतु हा निर्णय राज्यातील सरसकट सर्व शाळांसाठी आहे का? ? राज्य सरकारने असा निर्णय घेण्यामागचं कारण काय असावं? आणि यावर टीका का होत आहे? जाणून घेऊयातलेखन – दीपाली जगताप
निवेदन – जान्हवी मुळेएडिटिंग – अरविंद पारेकर
