Show notes
नवी दिल्लीतलं नवीन संसद भवन बनून तयार आहे. 28 मे 2023 ला त्याचं उद्घाटन होत आहे. पण हे उद्घाटन करणार कोण – पंतप्रधान की राष्ट्रपती, यावरून आता वाद रंगला आहे. या संसद भवनाचं लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते होतंय. सर्व विरोधी पक्षांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे की या कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांना आमंत्रण देण्यात आलेलं नाही.
देशातल्या अनेक विरोधी पक्षांनी एकत्रितपणे या कार्यक्रमावर बहिष्कार टाकलाय.कसं आहे हे नवीन संसद भवन? ते कसं उभारण्यात आलं? आणि आता त्यावरून वाद का रंगलाय? पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये.लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – अरविंद पारेकर

