Show notes
डायबिटीस, मधुमेह, साखर – आपल्या रक्तातली साखरेची पातळ वाढली की आपण साखर, गोडधोड सारंकाही सोडून पर्याय म्हणून काही कृत्रिम साखरेकडे वळतो. आणि आता, फक्त मधुमेह असलेलेच नाही तर आता निरोगी दिसणारी तरुण मंडळीसुद्धा साधं कोल्डड्रिंक नाही तर डायट सोडासारखे पर्याय घेतायत.
पण आता यातली कृत्रिम साखरसुद्धा फायद्याची नाही तर नुकसान करणारी ठरू शकते, असं जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) म्हटलं आहे.
पाहा WHOचा इशारा नेमका काय, आणि त्याचा अर्थ काय?
लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - अरविंद पारेकर
