सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
आफ्रिकेहून आलेल्या चित्त्यांचा भारतात मृत्यू का होतोय? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट
5 minutes Posted May 1, 2023 at 11:28 am.
0:00
5:24
Download MP3
Show notes

17 सप्टेंबर 2022 रोजी पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी नामिबियाहून 8 चित्ते भारतात आणले गेले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते आणले गेले. अशा एकूण 20 चित्त्यांपैकी आतापर्यंत दोन चित्त्यांचा जीवही गेलाय.

असं काय झालं की हे परदेशी पाहुणे भारतात, मध्य प्रदेशातल्या कूनो राष्ट्रीय उद्यानात येऊन दगावले? त्यांच्यासाठी ही जागा पुरेशी नव्हती की त्यांना इथलं हवामान मानवलं नाही?

जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये.

वार्तांकन – नितीन श्रीवास्तव, बीबीसी प्रतिनिधी

लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – अरविंद पारेकर