Show notes
विधिमंडळाला 'चोरमंडळ' म्हटल्यावरून विधानसभेत खासदार संजय राऊत यांच्याविरोधात भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला. त्यावर नेमकं पुढे काय होणार हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. पण यानिमित्तानं विधिमंडळाचे विशेषाधिकार आणि हक्कभंग पुन्हा चर्चेत आले आहेत. हक्कभंग म्हणजे नेमकं काय असतं, त्याची प्रक्रिया काय आहे आणि संजय राऊतांवर काय कारवाई होऊ शकते, जाणून घेऊयात.
संशोधन – टीम बीबीसी
लेखन, निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर

