Show notes
तुम्ही किंवा तुमचे आईबाबा, किंवा आणखी कुणीही नोकरी करत असेल, तर एक प्रश्न नेहमी चर्चेत असतो – 60नंतर काय? पेन्शन आहे का? आपल्यापैकी काही जणांना पेन्शन मिळतही असेल किंवा काही जण पेन्शनसाठी झगडत असतील.
पण आता सुप्रीम कोर्टाच्या एका आदेशामुळे काही आजी-माजी कर्मचाऱ्यांना वाढीव पेन्शनचा मार्ग मोकळा झाला आहे. ही EPS, EPF, EPFO ची भानगड आहे तरी काय? लाखो आजी-माजी कर्मचाऱ्यांचं पेन्शन वाढण्यासाठी 3 मार्च ही तारीख का महत्त्वाची आहे? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्ट मध्ये. वार्तांकन – टीम बीबीसीलेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकरएडिटिंग – अरविंद पारेकर
