Show notes
येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालक आणि विद्यार्थी दोघांना आधार कार्डची सक्ती आहे. बीडमध्ये एका शिक्षण संस्थेनं बोगस विद्यार्थी दाखवूत लाखो रुपयांचा गैरव्यवहार केला. त्यामुळे असे प्रकार थांबवण्यासाठी सरकार पावलं उचलतंय. प्रत्येक शाळेत 'व्यवस्थापन समिती' असते हीच समिती आता 'प्रवेश देखरेख समिती' म्हणून काम पाहणारे. काय आहेत शाळा प्रवेशासाठीचे नवीन नियम? जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्टमध्ये.
लेखन - दीपाली जगताप
निवेदन – विशाखा निकम एडिटिंग – अरविंद पारेकर
