Show notes
शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं।
विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांङ्गम्।।
लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं।
वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्।।
अर्थ:
ज्यांची आकृती( रूप)अतिशय शांत आहे,
ज्यांनी शेषनागाच्या शय्येवर शयन केले आहे,
ज्यांच्या नाभितून कमळ उत्पन्न झाले आहे,
जे सर्व देवांचे ईश्वर असून विश्वाचा आधार आहेत,
जे आकाशाप्रमाणे सर्वव्याप्त आहेत,
ज्यांचा वर्ण निलमेघाप्रामाणे आहे,
ज्यांचे सर्वांग शुभ आहे,
ज्यांना योगी पुरुषांप्रमाणे नित्य ध्यान करून प्राप्त केले जाऊ शकते,
सर्व लोकांचे स्वामी व माता लक्ष्मीचे पती असलेल्या ,
जन्म मरणाच्या भीतीचे हरण करणाऱ्या आणि
कमलदला प्रमाणे सुंदर नेत्र असणाऱ्या श्री भगवान विष्णुना मी वंदन करत आहे.
🌻 भारतीय गुरुकुल परिवार 🌻

