
लुप्त तारे भाग२
अक्षर भान या सदरातला हा आजचा पाचवा लेख. सदर सुरू करताना, साहित्याशी संबंधित घटना किंवा साहित्याची संबंधित असलेल्या विषयांवरती भाष्य करावं असा विचार जरी केला असला तरी, प्रसंगी काही विषयांवर व्यक्त होण्यास शिवाय पर्याय उरत नाही. त्यामुळे या सदरातून वेगवेगळ्या गोष्टीतलं हरवत चाललेलं भान जपण्याचा दर रविवारी आपण प्रयत्न करणार आहोत. सध्याचा साहित्य विश्वातला गाजत असलेला विषय मांडण्याचा प्रयत्न केला. दरी मिटवायची की दरी वाढवायची हे सगळ्या लोकांच्या हातात आहे. त्यामुळे सामंजस्याची भूमिका घेणारा मार्ग जेव्हा स्वीकारला जाईल तेव्हा गट उरणार नाहीत आणि तू नि मी एक ही भावना आणि संतांनी अपेक्षा केली त्याप्रमाणे चांगलं निर्मळ वातावरण निर्माण होईल. या लेखावर आलेल्या प्रतिक्रिया खूप मोलाच्या आहेत. लेखावर प्रतिक्रिया देताना अनेक दिग्गज लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने विषय समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे असं दिसतंय.तर या सर्व पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात जाहीर झालेले साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष माननीय डॉक्टर जयंत नारळीकर यांना मन:पूर्वक अभिनंदन !! साहित्यात येणारे अनेक प्रवाह साहित्याला वेगवेगळ्या विभागांमध्ये विभागणारे, त्यात ग्रामीण साहित्य, विद्रोही साहित्य, स्त्रीवादी साहित्य अशा वेगवेगळ्या प्रकारात अस्तित्वात असताना एक वेगळा वैश्विक आणि भविष्याकडे जाणारा विचार देणारं विज्ञान साहित्य निर्माण करणे त्या काळाची गरज होती. काल्पनिक विश्वात रमता रमता विज्ञानाला त्यात स्थान देऊन, विज्ञान आपल्याला कुठे घेऊन जाईल याची एक झलक आपल्या लेखनातून दाखवणारे नारळीकर संमेलनाचे अध्यक्ष असतील हा मराठी सारस्वतांचा आणि मराठी साहित्याचा गौरवच आहे. अशा वेगळ्या वाटा चोखाळणारे विज्ञाननिष्ठ लेखक अध्यक्ष असताना येत्या वर्षभरात साहित्याच्या क्षेत्रातही एक वेगळा विचार चांगला विचार रुजवतील अशी अपेक्षा करू या.संमेलन हा केवळ उत्सव न राहता साहित्यातले वेगवेगळे मार्ग वेगवेगळे विचार आणि वेगवेगळ्या प्रणाली यांना एकत्रित आणणारा, समजून घेणारा, त्यावर साधक-बाधक चर्चा करणारा असा एक मंच तयार झाला पाहिजे ही सामान्य रसिकाची अपेक्षा जयंत नारळीकरांच्या निवडीतून नक्कीच सार्थ ठरेल आणि त्या दिशेने आपलं मराठी साहित्य संमेलन वेगळे पायंडे ही पडेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.अक्षरभानच्या तिसऱ्या लेखात मी 'लुप्त तारे' हा मराठी साहित्यातल्या लुप्त झालेल्या ताऱ्यांबद्दल थोडी माहिती देणारा लेख लिहिला होता. आपल्या प्रदीर्घ आयुष्याच्या प्रदीर्घ सेवेतून मराठी साहित्य रसिकांसाठी दर्जेदार लेखन करणाऱ्या आणि त्या लेखनातून एक विचार देणाऱ्या अशा काही ताऱ्यांचा उल्लेख मी केला होता. पण याच साहित्याच्या क्षितिजावर काही तारे असेही आहेत, जे अचानक अपघाताने अकाली लुप्त झाले. हे तारे मराठी साहित्यात अधिक काळ तळपले असते तर मराठी साहित्याला एक नवी आभा प्रभा मिळू शकली असती हे निश्चित. अत्यंत कमी वयात मरण पावलेले बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचा ही आपल्याला विसर पडता कामा नये. निसर्गाला आपल्या शब्दरूपात पकडून साहित्य रसिकांच्या समोर उधळून देणारा हा कवी वयाच्या अवघ्या 28 व्या वर्षी जळगाव जिल्ह्यातल्या धरणगाव इथं अपघाताने मृत्युमुखी पडला. 'ती फुलराणी, आनंदी आनंद गडे श्रावणमास, औदुंबर' या कवितांनी आजही रसिकांवर तेवढीच भुरळ घातलेली आहे. अतिशय साधे शब्द, अतिशय रंजक विचार, निसर्गाच्या जवळ घेऊन जाणारे शब्द आणि शब्दा शब्दात भरलेला निसर्ग हे बालकवींच्या कवितेचं खास वैशिष्ट्य होतं. उणीपुरी दहा वर्षांची कारकीर्द असलेल्या या कवीचं अकाली निधन हे मराठी रसिकांना फार मोठा चटका लावून गेलं आणि त्यामुळेच अनेक सुंदर अर्थपूर्ण निसर्ग कवितांना महाराष्ट्र मुकला असंच म्हणावं लागेल.असेच अपघाताने अकाली आपल्याला, 'गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे' असं म्हणत रसिकांना पोरकं करून गेलेले आरती प्रभू हे सुद्धा साहित्याच्या क्षितिजावर नुकतेच चमकू लागले असताना लुप्त झालेले तारे आहेत. आरती प्रभू असं वेगळंच नाव धारण करून वेंगुर्ल्याच्या चिंतामणी त्र्यंबक खानोलकर या युवकाची वयाच्या चोविसाव्या वर्षी म्हणजे 1954 साली कविता आणि कथा शून्य शृंगारते ही त्यांची पहिली 'आरती प्रभू' या नावाने प्रसिद्ध झालेली कविता होती. आरती प्रभू या नावाचीही एक गंमत आहे. शालेय वार्षिकात ते 'पुष्पकुमार' या नावाने लिहीत असत. पण नंतर गाव सोडून मुंबईला गेल्यावर त्यांच्या प्रभू-खानोलकर या आडनावातलं प्रभू आणि घरी त्यांना लाडाने आत्या रघुराम म्हणत असते मधला 'आर' आणि त्र्यंबकचं 'टी' असं करून आर. टी. प्रभू हे नाव त्यांनी कवितांसाठी धारण केलं आणि त्याच नावाने ते अखेरपर्यंत कविता करत राहिले. आर.टी. चं मराठी साहित्यविश्वात 'आरती' झालं आणि आरती
This podcast uses Anchor (from Spotify) for stats, tracking, and dynamic audio. What this means Episodes play from the podcast's own servers, unmodified. Not affiliated with Podbay.
