
विखारप्रणाली
*विखारप्रणाली*गेल्या आठवड्यात मराठी साहित्याच्या क्षेत्रात खूप मोठी खळबळ उडाली. विदर्भातली मोठी संस्था असणाऱ्या 'विदर्भ साहित्य संघ' या संस्थेने ज्येष्ठ साहित्यिक यशवंत मनोहर यांना 'जीवनव्रती' हा पुरस्कार घोषित केला. त्याला मनोहरांनी अनुमती दिली पण पुरस्कार वितरणाच्या दिवशी मात्र या ज्येष्ठ साहित्यिकांनी 'पुरस्काराच्या कार्यक्रमात सरस्वतीची प्रतिमा आहे म्हणून मी पुरस्कार स्वीकारू शकत नाही कारण मी सरस्वती मानत नाही.' अशा प्रकारचे स्पष्टीकरण देऊन पुरस्कार स्वीकारला नाही. त्यावर साहित्य संघाने त्यांचं स्पष्टीकरण दिलं. इथे विषय खरं तर संपायला हवा होता. माध्यमं आणि समाजमाध्यमातून दोन्हींच्या विरोधात आणि समर्थनार्थ तुंबळ वाक् युद्ध सुरू झालं. विषय घसरत घसरत हिंदुत्व, राजकारण, जातीयवाद, आंबेडकर, फुले, ब्राह्मण, अत्याचार शोषण असं करता करता एकमेकांची आय-माय काढण्यापर्यंत घसरला; आणि वेगवेगळ्या रंगांचे आणि चिन्हांचे झेंडे या साहित्याच्या आकाशात नंगा नाच करू लागले. त्यात माझ्यासारख्या असंख्य अक्षर वारकऱ्यांची अवस्था पार गुदमरल्यासारखी झाली. अरविंद जगताप यांचं 'जगण्याच्या वारीत मिळेना वाट, दाटले मोहाचे धुके घनदाट, आपली माणसं आपलीच माती तरी कळपाची मेंढरास भीती विठ्ठलाssss कोणता झेंडा घेऊ हाती' हे गीत अशा परिस्थितीत मला सारखं सारखं आठवत राहिलं.मनोहरांचं 'व्यक्तिस्वातंत्र्य' मान्यच आहे पण त्याचवेळी विदर्भ साहित्य संघाचं 'धारणा स्वातंत्र्यही' मान्य आहेच!! आणि ते सगळ्यांनीच मान्य करायला पाहिजे, हेच आपली संस्कृती,धर्म,संस्कार, तत्त्वज्ञान वारंवार सांगायचा प्रयत्न करतात. आणि युगानुयुगं हे प्रयत्न सुरू आहेत. महर्षी व्यासांपासून बा. भ. बोरकर आणि अगदी आमच्या पिढीतलेही काही कवी हे सांगण्याचा प्रयत्न करतात. बोरकरांची 'प्रतिएक झाडामाडा त्याची त्याची रूपकळाप्रतिएक पनाफुला त्याचा त्याचा तोंडवळा' ही कविता असो किंवा 'मीपण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो, जीवन त्यांना कळले हो' या कविता आपल्याला काय सांगतात?... हे आपण वाचतो, त्यांचा आस्वाद घेतो, टाळ्या वाजवतो मग ते स्वीकारू किंवा आचरणात का आणू शकत नाही? समाजामध्ये ही दुफळी कायम का दिसते? संतांनी आपलं सारं आयुष्य ही दुही मिटवण्यात खर्ची घातलं. विचारवंत (खरे) आजही प्रयत्न करतायत. तरी ही दरी वाढत चालल्याची चिन्ह वेळोवेळी का दिसून येतात? का आपण दुसऱ्याचंही स्वातंत्र्य मान्य करू शकत नाही? हिंदु धर्माला नावं ठेवणे हा एकमेव अजेंडा अनेक तथाकथित विचारवंतांच्या लेखनात, बोलण्यात, वागण्यात का दिसून येतो? हिंदू धर्मातल्या सगळ्याच गोष्टी वाईट असून त्यांना झिडकारलं पाहिजे, अशा प्रकारचे विचार वेळोवेळी विद्रोही लोक व्यक्त करताना दिसतात . डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा धर्मांतराचा निर्णयही त्यावेळच्या समाजाने मोठ्या मनाने मान्य केला. वेगवेगळी स्थित्यंतरं त्यानंतर समाजामध्ये दिसून आली. स्पष्टपणे म्हणायचं झालं तर आजच्या घडीला सामाजिक दृष्टीने, कायद्याच्या दृष्टीने सगळे समान पातळीला आहेत. अधिकच स्पष्ट बोलायचं झालं तर आर्थिक स्थिती ही समाजातलं अंतर वाढवणारी एकमेव गोष्ट आहे आज. खरंतर 'लुप्त तारे' या माझा लेखाचा दुसरा भाग लिहिण्याचं मी ठरवलं होतं. जे तारे साहित्याच्या नभांगणात आपली अक्षय मुद्रा उमटवून गेले, आपले ठाम विचार रसिकांच्या समोर त्यांनी मांडले. एक विचार देऊन समाजाची जडणघडण करण्याचा प्रयत्न केला, समाजातलं अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला आणि समाजाला एक वळण लावण्याचा प्रयत्न केला. काळाच्या ओघात क्षितिजावर कुठेतरी ते लुप्त झाले. त्यांच्या कर्तृत्वाचा जागर करणं हे या लेखाचं प्रयोजन होतं. पण त्यांचं स्मरण करत असताना पुन्हा एकदा वादळ निर्माण करणाऱ्या अनेक घटना साहित्यक्षेत्रात होताना दिसतात, समाजात घडताना दिसतात आणि मग मन खट्टू होतं.शेकडो संस्था, असंख्य कार्यकर्ते आणि हजारो कायदे आणि नियम एवढं करूनही आपला समाज दोन फळ्यामध्ये विभागलेला का आहे? या विचाराने मन अस्वस्थ होतं. आणि म्हणूनच थोडा विषय बदल करून लिहावं लागतंय. वेगळा विचार मांडणे म्हणजे विखार ओकण्यासारखं आहे का? माझ्या एका मित्राने त्याचा विचार मांडण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारची वादळ उठणं कसं चुकीचं आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला, तेव्हा अतिशय गलिच्छ भाषेमध्ये त्याच्यावर टीका केली गेली. त्याने 'विचार प्रणाली' आणि 'विखार प्रणाली' अशा दोन शब्दांचा वापर केला. खरोखर पदोपदी हे जाणवत राहतं की समाजातले 90% लोक जेव्हा सामंजस्याने, एकोप्याने आणि प्रेमाने राहण्याचा ,मनात कुठलीही किल्मिष न बाळगता आपलं कर्तृत्व सिद्ध करून जगण्याचा प्रयत्न करतात; त्यावेळी फक्त दहा टक्के लोक समाज विघातक विचार करण्यात गुंतलेले असतात आणि तेच 10% समाज माध्य
This podcast uses Anchor (from Spotify) for stats, tracking, and dynamic audio. What this means Episodes play from the podcast's own servers, unmodified. Not affiliated with Podbay.
