अक्षरभान-निकिता भागवत
अक्षरभान-निकिता भागवत
Maau & Bunny show by Arnav Bhagwat
Feb 27, 2021 · 10 min

सन्मान विज्ञान साहित्याचा

MP3
अक्षरभान लेख क्र. 6
विज्ञानव्रती अध्यक्ष
लहानपणी वाचनात फारसा रस नसलेल्या पण अत्यंत चौकस बुद्धी असलेल्या, 'प्रेषित' वाचायला सुरुवात केल्यावर झपाटून जाऊन संपूर्ण पुस्तक वाचूनच खाली ठेवणाऱ्या  माझ्या धाकट्या भावाची आठवण झाली. त्याचा तो उजळलेला चेहरा आणि चमचमणारे डोळे आजही मला स्पष्ट आठवतात. साहित्याचं एक नवीन दालन असलेल्या आणि भविष्याचा वेध घेणाऱ्या विज्ञान कथा ही कल्पनेची सैद्धांतिक आधार असलेली उत्तुंग भरारी आहे असं मला वाटतं. 
आजकाल आपल्या समाजाला काय झालंय ते कधी कधी खरंच कळेनासं होतं…कोणीही कशाचाही विरोध करतो, कुठल्याही गोष्टीसाठी कोणालाही जबाबदार धरतो. एका बाबतीत एक न्याय, दुसरीकडे दुसराच….पार गोंधळलेल्या अवस्थेत माझ्यासारखे पामर दोन गटांचं तुंबळ यद्ध बघत बसतात. मुद्दा कोणताही असू द्या, लग्गेच दोन गट तयार होतात. तेही भाले, तलवारी, बंदुका अशी शस्त्रास्त्रं घरूनच…..मग युद्ध, युद्ध ना राहता चिखलफेक सुरू होते आणि दोन्ही गटातले लोक परस्परांना बरबटून टाकतात. युद्ध संपल्यावर मैदानात उरतात ते संस्कृती, इतक्या शतकांच्या उत्क्रांतीतून, मंथनातून वर आलेल्या संस्कार नावाच्या नवनीताचे, विखार, तिरस्कार आणि असूयेच्या आगीत वितळून वाहिलेले पाट….
आता, दोन आठवड्यांपूर्वीच सरस्वती पूजनावरून पुरस्कार नाकारणाऱ्या,  स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्या आणि आधुनिक विचार करणाऱ्यांची पाठराखण करणारे लोक समाज माध्यमांतून प्रचंड सक्रिय झाले होते. मग आल्या साहित्य संमेलनाच्या निवडणुका...पद्मभूषण डॉ. जयंत नारळीकर यांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर, मला वाटलं की त्या सगळ्या लोकांना खूप आनंद झाला असेल….चला, आधुनिक विचारांची धुरा खांद्यावर घेतलेला, विज्ञानव्रती मनुष्य अध्यक्ष झाला, त्यांचं जोरदार स्वागत केलं जाईल…..तर म्हणे, ते कुठे साहित्यिक आहेत? त्यांनी असं काय 'साहित्य' निर्माण केलंय? 
आता मला सांगा, एका व्रतासारखा विज्ञान प्रसार आयुष्यभर करणं, त्यासाठी नवनवीन प्रयोग, उपक्रम करणं याबरोबरच मोलाचा वाटा जयंत नारळीकरांच्या विज्ञान कथांचा आहे.
हे काही ते आज करत असलेलं काम नाही. 1975 साली कराडला झालेल्या साहित्य संमेलनात त्या वर्षीच्या संमेलनाध्यक्ष दुर्गा भागवतांनी जाहीरपणे जयंत नारळीकरांचा त्यांच्या नव्या दृष्टिकोनाबद्दल आणि साहित्यात एक नवीन प्रवाह खेळता केल्याबद्दल गौरव केला होता. म्हणजेच तोपर्यंत त्यांनी ह्या प्रवाहाला बऱ्यापैकी वाहतं केलं होतं.
मुळात आपल्या भारतात साधारण 1900 च्या दरम्यान कृष्णाजी आठले यांनी ज्यूल व्हर्नच्या कादंबरीचा 'चांद्रलोकची सफर' असा अनुवाद केला. त्यानंतर जवळजवळ 11 वर्षांनी म्हणजे 1911 मध्ये श्रीधर रानडे यांनी पहिली मराठी विज्ञानकथा ' तारेचे रहस्य' ही स्वतः लिहिली. त्यानंतरही वा. म. जोशी यांच्या दोन कथा 1914 मध्ये प्रकाशित झाल्या. त्यानंतर परत मोठा खंड पडला आणि स्वातंत्र्यलढ्याने देश ढवळून निघाला.. त्याकाळात परत विज्ञानकथा प्रवाह खंडितच झाला होता. 1950 नंतर पुन्हा एकदा हा प्रवाह भा.रा. भागवत, दि. बा.मोकाशी , यशवंत रांजणकर, खांबेटे, नारायण धारप, निरंजन घाटे यांनी अनुवादित किंवा स्वनिर्मित विज्ञानकथांतून  जिवंत ठेवला. 
आगदी अलीकडच्या काळात बाळ फोंडके, सुबोध जावडेकर लक्ष्मण लोंढे, माधुरी शानभाग, शुभदा गोगटे, अरुण साधू, अरुण मांडे यांनी आपली वैशिष्ट्यपूर्ण शैली तयार करत विज्ञान कथांमध्ये खूप मोलाची भर घातलीय. 
मुळात, विज्ञानकथा हा प्रकारच असा आहे ज्यात आशय ललित च्या अंगाने जात असला तरी आजूबाजूला झालेली भौतिक, तंत्रज्ञानाची  प्रगती त्यातून प्रमुखपणे डोकावत राहते आणि त्याचा भविष्यात मानवी नातेसंबंधांवर, सामाजिक स्थितीवर होणारा परिणाम लेखक कल्पकतेने मांडत असतो. त्यामुळे कल्पकतेला प्रचंड वाव तरीही त्याला विज्ञानाचं अधिष्ठान असलेला हा साहित्याचा फार आकर्षक प्रकार मला वाटतो. जयंत नारळीकरांनी ह्या प्रकाराला मान्यता मिळवून दिली आहे. त्यांचं विज्ञान आणि एकूणच सगळ्या क्षेत्रांतील काम, उंची यासाठी त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण म्हणून गौरवण्यात आलंय. साहित्य अकादमीचा पुरस्कारही त्यांच्या लेखक म्हणून आवश्यक असलेल्या मान्यतेची ग्वाही देतो.त्यामुळे माझ्यासारख्या साहित्य रसिकांना अत्यंत आनंद झाला आहे. 
नाशिक हे एकेकाळचं धर्मपीठ. तिथे होणाऱ्या अक्षरोत्सवाचे प्रमुख एक विज्ञानव्रती व्हावेत हा एक फार चांगला योग आहे. जयंत नारळीकर त्यांच्या सबंध आयुष्यभर विज्ञानाचा प्रसार, अंधश्रद्धांच्या निर्मूलनाच काम करत आलेत. पण त्याचं हे काम ते अंधश्रद्धेने नाही तर श्रद्धेने करतायत. म्हणजे कोणताही अतिरेकी बुद्धिवादी विचार न मांडता, ते नम्रपणे वाईट प्रथांच्या विरोधात लढा देतायत. धर्म नारळीकरांना मान्य आहे. त्याचं महत्व आणि बलस्थानही त्यांन

This podcast uses Anchor (from Spotify) for stats, tracking, and dynamic audio. What this means Episodes play from the podcast's own servers, unmodified. Not affiliated with Podbay.