
मित्रांनो तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करताय का?
तुम्हाला तुमच्या व्यवसायाची धमाकेदार सुरुवात करून तो पुढच्या १०० वर्षापर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त चालावा असे वाटेत का?
मग त्या आधी पुढील गोष्टी वाचा - मित्रांनो तुम्हाला माहित आहे का की १०० पैकी ५० व्यवसाय ज्या वर्षी सुरु होतात त्याच वर्षी बंद पडतात, आणि त्यातलेच ७० व्यवसाय पुढच्या १० वर्षात बंद होतात. शिवाय Institute for Business Value and Oxford Economics नुसार ९०% भारतीय स्टार्ट अप्स पहिल्या ५ वर्षात बंद होतात. ह्याची बरीच कारणे असली तरी ग्राहकाच्या गरजेनुसार Innovative प्रॉडक्ट किंवा सर्विसेस तयार करण्याची असमर्थता हे सर्वात मोठे कारण आहे. दुसरे कारण आहे आपले तरुण long Term व्यावसायिक प्लांनिंग करत नाहीत. या व अश्या चुका तुमच्याकडून होऊ नयेत म्हणून जाणून घ्या तरुणांनानी व्यवसाय सुरु करण्याआधीच्या ७ सिद्ध पायऱ्या. मी अजय दरेकर गेल्या १७ वर्षात हजारो तरुणांना भेटलो आहे. Versatile Educaare System अंतर्गत Youth Business Hub मध्ये आम्ही तरुणांना त्यांच्या उपजत गुणांसाठी प्लॅटफॉर्म व ट्रेनिंग देत आहोत. तसेच तुमच्या सुप्त गुणांना शोधून त्यानुसार यशस्वी व्यवसाय उभा करण्यास वेगवेगळ्या प्रोग्रॅम च्या माध्यमातूम मार्गदर्शन करतो.
१. तुमची “Passion” शोधा
२. तुमच्या व्यवसाय क्षेत्राचा अभ्यास करा (Know Your Market)
३. आर्थिक नियोजन (Business Finance)
४. Sacrifices ( त्याग करण्याची मानसिकता बनवा)
५. योग्य "Mentor" मार्गदर्शक आत्ताच निवडा
६. व्यवसायाच्या सर्व घटकांचा अभ्यास करा
७. प्लँनर बणा
"If you fail to plan it means you are planning to fail" म्हणजे जर तुम्ही प्लॅन करण्यात अपयशी ठरला तर कदाचित तुम्ही अपयशी होण्याचे प्लॅन केले आहे. प्रत्येक यशस्वी व्यवसायिकाला माहित असते कि पुढच्या एक, तीन आणि पाच वर्षात तो कोणती धेय्य साध्य करणार आहे आणि हेच त्यांच्या सातत्य पूर्ण यशाचे कारण असते. तुम्हाला माहित असले पाहिजे तुम्ही केव्हा कुठे आणि कसे पोचणार आहेत. त्यासाठी तुम्हाला कोणाची आणि कसली मदत लागणार आहे आणि तुम्हाला कोणत्या अडचणींवर मात करण्यासाठी काय तयारी करावी लागेल, काय शिकावे लागेल. ह्याचाच अर्थ तुम्हाला दूरदृष्टी (anticipation) ची कला अवगत करावी लागेल. एका लेखात मी नक्की दूरदृष्टी (anticipation) वर लिहेन कारण हा व्यवसायिकेतचा जबरदस्त गुण मी बऱ्याच यशस्वी व्यावसायिकांमध्ये पहिला आहे.
तर मित्रांनो ह्या पायऱ्या follow करा आणि धमाकेदार सुरुवात करा तुमच्या नवीन व्यवसायाची, तुम्हाला वरीलपैकी कोणत्याही पायरीबाबत जास्त माहिती किंवा शंका असतील तर नक्की संपर्क करा. अश्या जबरदस्त गोष्टी शिकण्याची तुमची इच्छा असेल तर आमचा Versatile Youth Business Hub हा फेसबुक ग्रुप जॉईन करा, आमच्या संपर्कात राहण्यासाठी पुढील Whats App ग्रुप जॉईन करा . तसेच विविध Skills शिकण्यासाठी आपल्या YouTube Channel ला Subscribe करा. Blog शेवटपर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद.
व्यवसाय अयशस्वी होण्याची 6 कारणे व त्यावरील उपाय
"५ जबरदस्त गुण जे तरुणांना उपजतच व्यावसायिक बनवतात"
Nov 30, 2020
10 min

"मित्रांनो तुम्हाला खात्री आहे का, की शाळा आणि College मध्ये तुम्ही जे शिक्षण घेतलेत किंवा घेत आहात फक्त त्याच्याच जोरावर तुम्ही उत्कृष्ट व्यावसायिक होऊ शकता?" नक्कीच नाही,
उलट भारतीय शिक्षण व्यवस्था इंग्रजांनी कारकून निर्माण करण्यासाठी तयार केली आणि आपण गेली ७० वर्ष त्याचेच अनुकरण करतोय हे आता सिद्ध झाले आहे. बघा ना अगदी २४-२५ वय होईपर्यंत आपल्याला पैश्याचे व्यवहार करायला भीती वाटते, स्वतःचे निर्णय स्वतः घेणे कठीण जाते, आपल्यातली Creativity हळूहळू कमी होत जाते, आपण इन्व्हेंशन करायला पुढाकार घेत नाही इत्यादी ... म्हणून काळाची गरज आहे कि आपण तरुणांनी ह्या चौकटीबाहेर पडून स्वतःच पुढाकार घेऊन काही महत्वाचे गुण आत्मसात करायला हवेत. तुम्ही चांगली पुस्तके व माणसे वाचली पाहिजेत अनुभवली पाहिजेत, मला माझ्या आयुष्यात ह्याचा खूपच फायदा झाला. मी माझ्या ब्लॉग च्या माध्यमातून व YouTube व्हिडिओच्या माध्यमातून असे काही गुण तुमच्यापर्यंत पोहचवत आहे त्याचा तुम्ही लाभ घ्या, आणि आजच्या युगात यशस्वी व्यावसायिक होण्यासाठीचे मूलभूत आणि प्रभावी गुण समजून घेण्यासाठी हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा
नमस्कार मित्रांनो मी अजय दरेकर तुमचा "तरुण व्यावसायिक मार्गदर्शक" गेले १७ वर्ष विद्यार्थी विकास क्षेत्रात कार्यरत असून “Versatile Educaare System” आणि “Versatile Youth Business Forum” च्या माध्यमातून तरुणांना व्यवसाय व व्यक्तिमत्व विकासाचे मार्गदर्शन करत आहे.
चला मग जाणून घेऊया ५ मूलभूत तरी अतिप्रभावी गुण जे तुम्ही आत्मसात करायला हवे
१.आऊट ऑफ द बॉक्स थिंकिंग
२.नेतृत्व गुण निर्माण करा
३.अनुभव घ्या
४.आर्थिक साक्षरता
५.सकारात्मक नातेसंबंध
तर मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल किंवा तुम्हाला कोणत्या विषयावर वाचायला आवडेल ते Comment बॉक्स मध्ये लिहा, आणि तुमची व्यावसायिक होण्याची तीव्र इच्छा असेल तर पुढील Facebook Community ला जॉईन करा.
whats app group - https://chat.whatsapp.com/CmYJWW1B2yAHM4kfQkUpN7
Oct 28, 2020
7 min

"५ जबरदस्त गुण जे तरुणांना उपजतच व्यावसायिक बनवतात"
" तुम्हाला माहित आहे का? संशोधनाने हे सिद्ध झालय की तरुण मुले जास्त चांगल्या पद्धतीने व्यवसाय करू शकतात."
भारतात ६०% तरुण हे शिक्षण घेऊनही अनएम्प्लॉएबल आहेत. तसेच ह्यातील कितीतरी तरुण चुकीच्या मार्गाने पैसे कमविण्याचा प्रयत्न करतात तर कितीतरी काही करायला नाही म्हणून डिप्रेशन मध्ये जातात. ह्याची बरीच कारणे असली तरी कालबाह्य शिक्षणव्यवस्था हे मूळ कारण आहे, शिवाय आपण तरुणांना व्यवसायासाठी उद्दयुक्त करत नाही. व्यवसाय हे असे माध्यम आहे जे तरुणांना स्वतंत्र विचार करायला तर शिकवतेच आणि पैश्यांचे , वेळेचे , निर्णयाचे स्वातंत्र देते. म्हणून जास्तीत जास्त तरुणांनी व्यवसायाकडे वळणे हे त्यांच्यासाठी आणि आपल्या देशासाठी खूप उपयोगी ठरेल. मग आज जाणून घेऊया ५ जबरदस्त गुण जे तरुणांमध्ये उपजतच असतात ज्याला चालना दिली तर वरील बऱ्याच अडचणी दूर होऊ शकतात. आणि तुम्ही तरुण असाल किंवा तरुणांचे पालक असाल हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा तुम्हाला कृती करण्यासारख्या आणि तरुणांना प्रोत्साहनासाठी बऱ्याच गोष्टी इथे मिळतील.
मी अजय दरेकर गेल्या १७ वर्षात अशा हजारो तरुणांना भेटलो आहे. “Versatile Educaare System” अंतर्गत “Versatile Youth Business Forum” मध्ये आम्ही तरुणांना त्यांच्या उपजत गुणांसाठी प्लॅटफॉर्म व ट्रेनिंग देत आहोत.
चला मग जाणून घेऊया ......
१. “No Fear of Loosing” (अपयशाची भीती नसते) -
जगभरातील यशस्वी व्यावसायिकांचा अभ्यास केल्यावर हे लक्षात आले आहे कि त्यांपैकी जवळजवळ प्रत्येकालाच बऱ्याच वेळेला अपयशाला सामोरे जावे लागले आहे , तरी सुद्धा ह्या व्यावसायिकांमध्ये अपयशाची भीती नव्हती.
विशेष म्हणजे बालकावस्था व तारुण्यावस्थेमध्ये अपयशाची भीती नसल्याकारणाने मुले व तरुण वेगवेगळे प्रयोग करण्यास नेहमी तत्पर असतात आणि म्हणून त्यांचा हा गुण व्यवसायासाठी अतिउत्तम ठरतो. उदा. मार्क झुकेरबर्ग - फेसबुक
२. टेकनॉलॉजिमध्ये एक्स्पर्ट -
आजच्या काळात पालकांना , शिक्षकांना मुलांकडून टेकनॉलॉजि शिकावी लागत आहे . तो काळ दूर नाही जेव्हा ३ ते ४ वर्षाचे मुलं प्रोग्रामिंग करून रोबोट बनवून घरी त्यांच्यासोबत खेळतील किंवा कामे करून घेतील. त्यामुळे आजच्या काळात यशस्वी व्यावसायिक होण्यासाठी लागणारे सर्वात मोठे शास्त्र “टेकनॉलॉजि” हे तरुणांकडे उपजतच आहे.
३. जिज्ञासू वृत्ती –
" मी हे केले तर काय होईल?" , " ही गोष्ट अशीच का बनवली जाते?" असे प्रश्न बालवयात व तरुणपणातच मुलांना नैसर्गिक रित्या पडतात. जगातले सर्वच यशस्वी व्यवसाय हे कोणतीतरी अडचण सोडवण्यासाठी किंवा कठीण गोष्ट सोपी करण्यासाठी अस्तित्वात आले. आणि तरुणांची जिज्ञासू वृत्ती ह्यासाठी सर्वात पोषक आहे.
उदा. Google , Uber
४. Creativity -
गेल्या १७ वर्षात मी हजारो तरुणांना बघितलंय ज्यांनी “क्रीटीव्हिटी व टेकनॉलॉजि” च्या जोरावर स्वतःचे अस्तित्व उभे केले आहे . आजच्या तरुणांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर त्यांच्या क्रीटीव्हिटीमुळे व्यावसायिक जगतात अनेक विक्रम करू शकतील.
अगदी फोटोग्राफी, कूकिंग, फॅशन designing ह्या क्षेत्रात तरुण आज उत्तुंग कामगिरी करत आहेत त्यामुळे तरुणांनी आपल्या कल्पकतेला वाव दिला पाहिजे व शिक्षक - पालकांनी त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना व्यावसायिक होण्यास प्रवृत्त करायला हवे.
५. नवीन ज्ञान आत्मसात करण्याची ताकद –
आपल्या बालपणी आपल्याला एखाद्या गोष्टीचे ज्ञान मिळवण्यासाठी पुस्तक, शिक्षक व बाबा हेच माध्यम होते . आजच्या तरुणांकडे चौथी गोष्ट आहे ती म्हणजे गूगल बाबा. टेकनॉलॉजि चा उपयोग करून आजचा तरुण कोणत्याही क्षेत्रातले ज्ञान मिळवतोय व आत्मसात करून त्यावर कृती करतोय हीच त्याची खरी ताकद आहे.
तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की Comment करा. आणि तरुण व्यावसायिक घडवण्याच्या माझ्या मोहिमेत सहभागी होण्यासाठी खालील link वर क्लिक करून माझ्या फेसबुक ग्रुप ला जॉईन व्हा
https://www.facebook.com/groups/4572379476137547/
Oct 15, 2020
4 min
