दिग्गज रंगकर्मींच्या कलाप्रक्रियेचा वेध.
मराठी रंगभूमीशी निगडीत दिग्गज रंगकर्मींच्या मुलाखतींतून नाट्यलेखन, दिग्दर्शन, अभिनय, नेपथ्य, संगीत, प्रकाश आदी प्रक्रियांचं मूलभूत आकलन आणि संकलन करणं हे 'रंगपंढरी' वेब सिरीजचं उद्दिष्ट आहे.
एक प्रथितयश दिग्दर्शक कास्टिंग करताना नक्की काय निकष लावतो? किंवा एखादी प्रतिभावान नटी आपण कधीच न जगलेली भूमिका उमजून सजीव करताना नेमकं काय करते?...असं प्रत्यक्ष अनुभवातून आणि अनेक वर्षांच्या साधनेतून निर्माण झालेलं सूक्ष्म ज्ञान त्या त्या क्षेत्रातील मातब्बर व्यक्तींकडून मिळवावं; आणि त्यातून नवीन रंगकर्मींना केवळ प्रेरणाच नव्हे तर उत्तम नाटक निर्माण करण्यासाठी मू


