रामकुटी (Ramkuti)
रामकुटी (Ramkuti)
Shrikant Borkar
याजसाठी केला होता अट्‍टहास । शेवटचा दिस गोड व्हावा ॥१॥
3 minutes Posted Mar 9, 2023 at 2:37 am.
0:00
3:42
Download MP3
Show notes
संत तुकाराम महाराज यांचा अभंग
अंजली अशोक जोशी ताईं नी सादर

याजसाठी केला होता अट्‍टहास ।
शेवटचा दिस गोड व्हावा ॥१॥

आता निश्चितीनें पावलों विसांवा ।
खुंटलिया धांवा तृष्णेचिया ॥२॥

कवतुक वाटे जालिया वेचाचें ।
नांव मंगळाचे तेणें गुणें ॥३॥

तुका म्हणे मुक्ति परिणिली नोवरी ।
आतां दिवस चारी खेळीमेळी   ॥ ४॥