
हे स्रोत श्री राम प्रेमाष्टकम् या तत्त्वज्ञ यामुनाचार्य यांनी रचलेल्या गहन आठ श्लोकांच्या संस्कृत स्तोत्राचा अभ्यास करतात. या श्लोकांमध्ये भगवान श्रीरामांच्या दिव्य सौंदर्याचे जिवंत वर्णन केले आहे. त्यांच्या कमळासारख्या नेत्रांचे, श्यामवर्णाचे तसेच ऋषी-मुनींचे रक्षण करणारे आणि राक्षसांचा संहार करणारे पराक्रमी स्वरूप यांचे अत्यंत भावपूर्ण चित्रण केले आहे.आधुनिक साधकांना या स्तोत्राचा लाभ मिळावा यासाठी रामकुटी व्यासपीठावर झूम /google Meet आभासी (ऑनलाइन) वर्ग आणि सामाजिक माध्यमांच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना या पवित्र स्तोत्रांचे पठण शिकवले जाते. उपलब्ध चरित्रात्मक माहितीमध्ये या स्तोत्राचे कर्ते आळवंदार (यामुनाचार्य) हे श्रीवैष्णव परंपरेतील दहाव्या शतकातील एक महत्त्वाचे आचार्य असल्याचे नमूद केले आहे. त्यांनी राजवैभवाचा त्याग करून आध्यात्मिक जीवनाचा स्वीकार केला.यासोबत दिलेले भाषांतर आणि मार्गदर्शक सूचना यांमध्ये असे स्पष्ट केले आहे की, श्री राम प्रेमाष्टकम् चे श्रद्धापूर्वक पठण केल्याने भगवान श्रीरामांप्रती निःस्वार्थ आणि अखंड प्रेम विकसित होते तसेच साधकाला आध्यात्मिक मुक्ती (मोक्ष) प्राप्त होण्यास सहाय्य होते. अशा प्रकारे हे सर्व स्रोत प्राचीन वैदिक-धार्मिक तत्त्वज्ञान आणि आधुनिक डिजिटल शिक्षण यांचा सुंदर संगम घडवून हिंदू भक्तिपरंपरेच्या जतन व प्रसारासाठी महत्त्वपूर्ण योगदान देतात.
Aug 2
19 min

श्री विष्णूसहस्रनाम स्तोत्र सौ मेघाताई प्रशांत बांभोरीकर
#विष्णूसहस्रनाम
#अधिकमास
#हरी
@ramkuti
May 17
20 min

अयोध्येत श्रीराम प्रतिषठेनंतर दर्शनासाठी पोहोचले तेव्हा सुचलेली ही उत्स्फूर्त कविता
रामरायासमोर..
️दारी तुझ्या आले
आणले गेले रे
कुणाची ही इच्छा
सांगतोस का रे?
सांगतोस का रे?
आत्मिक इच्छा होती
कसे कळाले रे
कारण तूच
तूच ओळखले
तूच ओळखले ...
.
कोण करू शकेल
असे स्वप्न पूर्ण
आतली ही ओढ
आतच संपूर्ण
आतच संपूर्ण....
नेत्र सजल झाले
हृदय ओथंबले रे
तूही आस लावलीस
तूही आनंदी रे
तू ही आनंदी रे..
जन्मोजन्मीची ही
अनोखी पुण्याई
तुझीच तुला रे
अर्पण तुझ्या पाई
अर्पण तुझ्या पाई....
कोसोदूर अयोध्या कोसोदूर तू ही
भेट ही अनोखी तुला अशक्य नाही..
तुला अशक्य नाही...
आले तुझ्या पायी काय वर्णू भेट
जीवाची शिवाशी अद्वितीय भेट
अद्वितीय भेट...
हाच सुगंध हीच माती हाती
राम राम राम माळ टाळ हाती
माळ टाळ हाती..
आता अंतसमयी तुला आणण्याची
संधी ओळखली तुला भेटण्याची
तुला भेटण्याची.
होणार ही ही इच्छा पूर्ण माझ्या मनीची
कर्ता कर्माचा तू माझ्या
खूण ही अंतरीची.
खूण अंतरीची..
भगवंत हृदयस्थ आहे
अपर्णा परांजपे पुणे
Mar 21
3 min

नवधा भक्ति – राम मार्ग
रामचरितमानस में
भगवान राम ने
शबरी को भक्ति का मार्ग बताया,
नौ दीपकों जैसा प्रेम का प्रकाश जगाया।
संतों की संगति में बैठा जब मन,
वहीं से खुला प्रभु का पावन गगन।
राम कथा की धारा जब हृदय में बही,
भक्ति की ज्योति तब जीवन में जली।
गुरु चरणों में सिर जब झुकाया मैंने,
अहंकार का भार वहीं छोड़ आया मैंने।
राम के गुणों का गान जब होने लगा,
मन का हर अंधेरा भी खोने लगा।
राम नाम का जप जब होंठों पे आया,
विश्वास का दीपक दिल में जगमगाया।
इंद्रियों को साध कर चलना सीखा,
संतों के पथ पर जीवन को सीखा।
जब हर प्राणी में राम को देखा,
तब जग सारा ही मंदिर जैसा लगा।
जो मिला उसी में संतोष किया,
दूसरों के दोषों को कभी न लिया।
सरल हृदय और विश्वास का सहारा,
हर पल लगा राम ही हैं हमारा।
नवधा भक्ति का यही है सार,
राम मिलें जब हो प्रेम अपार।
राम नाम चमत्कार, राम नाम आधार,
भक्ति के नौ दीपक – राम ही उद्धार।
Mar 7
2 min

आईसाठी अधूनमधून एक चॉकलेट नेत जा,
त्यातून तुलाही अर्धं प्रेम मिळत जाईल… ️
थकलेल्या दिवसाच्या संध्याकाळी जेव्हा घरी परतशील,
हात रिकामे असले तरी, मन भरून घेऊन येत जा…
पण कधीतरी हास्यासोबत, ती छोटीशी गोड भेटही,
आईच्या नावाचं चॉकलेट सोबत नेत जा…
आईसाठी अधूनमधून एक चॉकलेट नेत जा,
त्यातून तुलाही अर्धं प्रेम मिळत जाईल…
ती काही बोलली नाही तरी डोळे बोलतात,
दरवाजाच्या आवाजावर अपेक्षा डोलतात,
तिच्या वाट्याचा आनंद असाच टाळू नकोस,
थोडा वेळ, थोडी माया तिला देऊन जात जा…
आईसाठी अधूनमधून एक चॉकलेट नेत जा,
त्यातून तुलाही अर्धं प्रेम मिळत जाईल…
जिने प्रत्येक कडवटपणात तुला गोड ठेवलं,
आपली स्वप्नं बाजूला सारून तुझं रक्षण केलं,
त्या आईसाठी काही खास करण्याचं निमित्त नको,
फक्त असंच प्रेम व्यक्त करण्याची संधी साधत जा…
आईसाठी अधूनमधून एक चॉकलेट नेत जा,
त्यातून तुलाही अर्धं प्रेम मिळत जाईल…
लक्षात ठेव, आईला वस्तूंच्या किमतीशी देणंघेणं नसतं,
तिला तर फक्त तुझ्या सोबतीची सवय असते,
तिच्या चेहऱ्यावरचं हास्य हीच सर्वात मोठी दौलत आहे,
ती दौलत तिला वारंवार देऊन जात जा…
आईसाठी अधूनमधून एक चॉकलेट नेत जा,
त्यातून तुलाही अर्धं प्रेम मिळत जाईल…
#रामकुटी #श्रीराम #श्रीरामभक्ती #रामनाम #रामराम #जयश्रीराम #रामचरित #रामभाव #रामप्रेम #रामस्मरण #रामधून #रामनाद #रामनामजप #रामनामचमत्कार #रामकविता #रामगीत #भक्तिगीत #भक्तीकाव्य #शब्दगुंफण #भावकुटी #मराठीभक्ती #मराठीकविता #मराठीसंगीत #आध्यात्मिक #सनातनधर्म #हिंदुधर्म #राममार्ग #रामभक्त #रामभावना #रामसंस्कार #Ramkuti #RamBhakti #RamNaam #JaiShriRam #RamMantra #RamDhuni #RamPoetry #RamBhajan #SpiritualVibes #IndianCulture #Sanatan #Hinduism #DevotionalMusic #MarathiBhakti
Feb 11
3 min
Load more





