Marathi Khidkitun
Marathi Khidkitun
IVM Podcasts
माणिक आणि डॉक्टर राजीव देशमुख आपल्याशी बोलणार आहेत 'मराठी खिडकीतून'!मराठी संस्कृतीकडे बघणार आहेत त्याच्यामध्ये मराठी साहित्य , कला ,परंपरा ,खाद्यसंस्कृती ,सभोवतालची परिस्थिती ,असं सबकुछ असणार आहे!हे बोलणं समस्त मराठी लोकांसाठी आहे!कोणत्याही वयाच्या ,महाराष्ट्रातल्या ,महाराष्ट्राबाहेरच्या, परदेशातल्या ,मराठी लोकांना हा कार्यक्रम नक्की 'आपला' वाटेल !तेव्हा मंडळी जरूर ऐका दर मंगळवारी आणि गुरुवारी!Manik & Dr. Rajiv Deshmukh present 'Marathi Khidkitun', a show that talks about Marathi culture, tradition, literature, cuisine and more.If you are a Maharashtrian, within the state or outside, or even based abroad, this show will speak to irrespective of age, and you will instantly feel at home.So folks, do tune in, fresh episodes every Tuesday & Thursday!
'मराठी खिडकीतून': शतक महोत्सवी एपिसोड :एक संवाद
गेल्या वर्षी तीन ऑगस्टला सुरू झालेल्या 'मराठी खिडकीतून' या पाॅडकास्टचा हा शंभरावा एपिसोड! त्यानिमित्ताने गेल्या वर्षभराचा आढावा घेत, तुमच्याशी संवाद साधत आहेत:डॉक्टर राजीव आणि माणिक!
Sep 1, 2022
36 min
मनमोकळ्या गप्पा.. दिलखुलास गप्पा..
'मराठी खिडकीतून' आपण स्वागत करत आहोत: बोलघेवड्या,'दोन बायका गप्पा ऐका' असं म्हणणाऱ्या,अपर्णा दीक्षित आणि अवंती दामले यांचं! त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारताना वेळ कसा गेला हे आम्हाला कळलंही नाही!त्या ऐकताना तुम्हालाही तसंच वाटेल!
Aug 30, 2022
45 min
डोकावूया, व. पु. काळे यांच्या घरी
व. पु.काळे म्हणजे एक सिद्ध- हस्त लेखक! हरहुन्नरी कलावंत!चला तर, व. पुं. च्या दोन घरात डोकावू या! आधी दादरच्या, आणि नंतर वांद्र्याच्या साहित्य सहवास मधील घरात.
Aug 25, 2022
15 min
न्यूटन आणि आईन्स्टाईन
न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध तर लावलाच आणि 1686 साली गतीचे तीन नियम सुद्धा प्रस्थापित केले!गुरुत्वाकर्षणाला आणि गतीलाआईन्स्टाईननं एक वेगळंच परिमाण दिल! त्याविषयी बोलत आहेत डॉक्टर राजीव आणि माणिक:
Aug 23, 2022
13 min
सुखी माणसाचा सदरा आणि एपीक्यूरस
प्रत्येक जणच सुख शोधत असतो, सुखी होण्याचा प्रयत्न करत असतो. ग्रीक तत्त्वज्ञ एपिक्युरस यांनी सांगितलेला सुखाचा मार्ग उलगडून दाखवत आहेत,डॉक्टर राजीव आणि माणिक.
Aug 18, 2022
14 min
कवी म. म. देशपांडे यांची कविता: 'कळत नाही'
प्रसिद्धीपासून दूर राहिलेले कवी म. म.देशपांडे! त्यांच्या 'वनफूल'या पहिल्या कवितासंग्रहातली ही कविता, 'कळत नाही'. ही कविता म्हणजे कवीच्या व्याकुळ मनाचं स्वगत आहे! या कवितेचा रसास्वाद घेऊ या, डॉक्टर राजीव आणि माणिक यांच्या बरोबर:
Aug 16, 2022
14 min
देऊ या ,आदिवासींना नवं भान
नागरी समाजापासून दूर आणि दुर्लक्षित राहिलेल्या आदिवासीसमाजाविषयी, आणि या आदिवासी बांधवांसाठी काम करणाऱ्या वेगवेगळ्या संस्थांविषयी,डॉक्टर राजीव आणि माणिक तुमच्याशी संवाद साधत आहेत.
Aug 11, 2022
15 min
देवरायांचं महत्व
वैदिक कालपासून देवराई ची संस्कृती चालत आली आहे! देवराई या संकल्पनेत श्रद्धा, आणि भीती सुद्धा दडलेली आहे! त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण,आणि संवर्धन कसं होतं,याविषयी तुमच्याशी बोलत आहेत डॉक्टर राजीव आणि माणिक.
Aug 9, 2022
12 min
आपत्ती सुरक्षा आणि पेल्ट्झ परिणाम
कोणत्याही आपत्तीने माणूस हवालदिल होतो, पण त्याला थोडेफार सुरक्षा- कवच मिळाले की,तो निर्धास्त होतो! या पेल्ट्झ परिणामाबद्दल बोलत आहेत: डॉक्टर राजीव आणि माणिक.
Aug 4, 2022
13 min
करड्या रसायन शास्त्राकडून, हिरव्या रसायन शास्त्राकडे
'हरित' रसायन शास्त्राचा पुरस्कर्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रसायन- शास्त्रज्ञ-रॉबर्ट ग्रब्ज- यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल, आपल्याशी संवाद साधत आहेत डॉक्टर राजीव आणि माणिक.
Aug 2, 2022
12 min
Load more