
भगवंताची मिठी
🌷🌷🙏🏻🙏🏻🌷🌷*भगवंताची मिठी...**भगवंताचं होणं .......सोप्प नसतं हो भगवंताचं होणं...प्रचंङ निरागसता लागते...स्वच्छ मन लागतं.**तुम्ही कधी भगवंताला मिठीत घेतलय का? नाही ना.....**कधी सहज म्हणुन कुणाला निरपेक्ष मदत केलीए का? करून बघा....भगवंत स्वतःहुन मिठीत घेईल.**अतिव दुःखात कुणाला आधार दिलाय का? देऊन बघा.....भगवंत स्वतःहुन मिठीत घेईल.* *कुणाच्या उर्त्कषाचं कारण व्हा.......कुणाच्या यशात भक्कम साथ द्या.......भगवंत स्वतःहुन मिठीत घेईल.* *कुणी कुणाचं नसतं हो.....तरीही कुणाचंतरी व्हायला काय हरकत आहे? आई नसलेल्याची आई व्हा.....कुणाची ताई व्हा......कुणाचा बाप व्हा तर कुणाचा भाऊ....मग बघा....भगवंत स्वतःहुन मिठीत घेईल.**कुणाच्या चेहर्यावरचं हास्य बना.....कुणाचे अश्रूंनी तुङुंब भरलेले डोळे पुसा....मग बघा..भगवंत स्वतःहुन मिठीत घेईल.**वार्धक्याने थकलेल्या पायांना तुमच्या हातांची ऊब द्या.....थरथर कापणारे हात समाधानाने आशिर्वाद देतील.....मग भगवंताने स्वतःहुन मिठी मारल्यासारखं वाटेल.* *आज प्रत्येक जण पैसे कमवायच्या मागे लागलाय.....स्वतःच स्टेटस वाढवायचय्* *प्रत्येकाला....कुणाच्यातरी आयुष्यात आपल्या वाटणीचा ओंजळभर आनंद देऊन तर बघा....खात्रीने सांगतो त्यांच्या मनातलं तुमचं स्टेटस खुप ऊंचावर असेल....अन् त्याच वेळेस भगवंताच्या मिठीची चाहुल लागेल....**व्याकुळ नजरेने पाहत असलेल्या मुक्या जनावरांना पाणी द्या....अन्न द्या....ते आमरस नाही हो मागत....तुम्ही दिलेल्या शिळ्या पोळीतच ते खुष असतात......कधी स्वतः जवळची ताजी पोळी देऊन तर बघा......भगवंत स्वतःहुन मिठीत घेईल.**आपल्याकङे आपलं असं काय आहे? ....भगवंतानीच दिलेल्याचा आपण तोरा मिरवतो......मग त्यानी दिलेलं .....कघी कुणाला मनापासुन द्या.......मग बघा* *भगवंत मिठी मारल्याशिवाय राहणार नाही*
This podcast uses Anchor (from Spotify) for stats, tracking, and dynamic audio. What this means Episodes play from the podcast's own servers, unmodified. Not affiliated with Podbay.
