
नमस्कार, मी सुप्रिया कांदेकर; Legible Mind: मराठी कविता Podcast च्या आजच्या episode मध्ये सादर होणार्या कवितेचे नाव आहे 'सांगावा.'
नव्याने जग पाहणाऱ्या मुलाला वडील सांगावा धाडतात की शर्थीने ह्या जगाचा सामना कर आणि मेहनतीने जिंक.
Apr 29, 2021
1 min

नमस्कार, मी सुप्रिया कांदेकर; Legible Mind: मराठी कविता Podcast च्या आजच्या episode मध्ये सादर होणार्या कवितेचे नाव आहे 'निरोप.' मुलगा शिकला की तो कामासाठी शहरी किंवा बाहेरगावी जातो. निरोप घेणं हे आपल्या प्रत्येकासाठी खूप कठीण असतं. आणि त्यात आई-मुलाच्या निरोपाची वेळ म्हणजे अत्यंत भावनिक, नाजूक, आणि असह्य असा क्षण तीच भावना व्यक्त करू इच्छिते.
Read Here: https://legiblemind.wordpress.com/2021/03/27/nirop/
Apr 24, 2021
1 min

नमस्कार, मी सुप्रिया कांदेकर. Legible Mind: मराठी कविता Podcast च्या दुसऱ्या episode मध्ये आजच्या सादर होणार्या कवितेचे नाव आहे 'पॅसिफिक.'
पॅसिफिक शब्दाचा अर्थ आहे शांत आणि सौम्य. पण आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की पॅसिफिक महासागर असो वा मानवी मन, दोन्हीही ह्या संकल्पनेला अपवाद आहेत. त्या दोघांचा विचलितपणा ह्या कवितेमार्फत अधोरेखित करू इच्छिते.
Read Here: https://legiblemind.wordpress.com/2021/04/13/pacific/
Apr 13, 2021
1 min

आजचा हा आपला पहिला episode; आजपासून आपला हा कवितांचा सुरेख प्रवास सुरू होत आहे. माझ्या आजच्या कवितेचे नाव आहे, 'बदलती नारी!'
ह्या प्रेरणादायी कवितेतून स्त्रीची मनावस्था व्यक्त होते, कायम इतरांसाठी जगणारी 'ती' स्वतःसाठी जगणंच विसरते. ही कविता त्या बदलाची जाणिव आहे, आत्मसामर्थ्य ओळखण्याची आहे, आत्मज्ञान व आत्मसन्मानाची जाणिव करणारी आहे.
Read Here: https://legiblemind.wordpress.com/2021/03/28/badalati-nari/
Apr 6, 2021
2 min
