
गेलं १ १/२ वर्ष हे करोना मध्ये आपण सगळे अडकलो आहे. सारखे lockdown, रेस्ट्रीकशन्स ह्यामुळे अर्थव्यवस्थेवर खूप परिणाम झाला आहे.
नेमका कोणाला जास्त त्रास झाला आणि कोणी ह्यातून संधी शोधली ?
खरंच पुढचा काळ भारताचा आहे का?
भांडवल कसं मिळवता येईल ? भांडवल मिळवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या ?
कोणत्या क्षेत्रांना जास्त scope आहे?
अश्या अनेक विषयावंर गप्पा केल्या आहेत इन्स्पिरेशन कट्टा च्या ४०व्या भागात उद्योजक आणि लेखक चारुदत्त पांडे ह्यांच्याशी.
चारुदत्त हे सुहृद ह्या त्यांच्या संस्थे मार्फत लघु आणि मध्यम उद्योगांना consulting करतात.
त्यांच्या बद्दल अधिक माहिती त्यांच्या website आणि social media वर मिळेल.
https://www.linkedin.com/in/charudatta-pande-73847616/
https://mobile.twitter.com/charudattapande
https://www.facebook.com/charudatta.pande.7
त्यांनी लिहिलेला पुस्तक इथे मिळेल - १ ) https://amzn.to/2Uba9Qn
२) https://amzn.to/3dsF80N
त्यांनी सांगितलेला पुस्तक इथे मिळेल - https://amzn.to/3yl0CoH
आमची website आहे www.mipodcaster.com. FB, Insta, Youtube आहे @mipodcaster
---
Send in a voice message: https://anchor.fm/nachiket-satish-kshire/message
Jun 30, 2021
48 min

आजच्या पिढीला जन्मापासून स्मार्टफोन आणि इंटरनेट बघायला मिळाले, म्हणून अर्थातच ते आधीच्या पिढ्यांपेक्षा स्मार्ट आणि हुशार आहे.
अश्या हुशार आणि स्मार्ट मुलांना त्याचं प्रकारचे मार्गदर्शन आणि संधी देणं हे पालकांचं आणि एकंदरीत संपूर्ण समाजाची जवाबदारी आहे.
कॉंसिअस पॅरेंटिंग म्हणजे काय? मुलाच्या विकासाचे टप्पे कोणते असतात ? रचनावादी शिक्षण म्हणजे काय ? रचनावादी पद्धतीने घरी कसे वागता येईल?
ह्या आणि अश्या अनेक विषयांवर गप्पा मारल्या आहेत अश्विनी गोडसे ह्यांच्याशी इन्स्पिरेशन कट्टाच्या ३९व्या भागात.
अश्विनी ताई गेली २० वर्षे बालशिक्षणामध्ये काम करते आहे. ग्राममंगल, युनिसेफ अश्या संस्थांबरोबर काम करण्याचा तिचा अनुभव आहे.
आता पालकांना आणि शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी तिने The Learning Planet हे venture सुरु केले आहे.
तिचा ई-मेल आहे [email protected]
YouTube चॅनेल - FB Page
You Tube Channel
तिने सांगितलेले पुस्तक इथे मिळेल - https://amzn.to/3xxYCsv
आमची website आहे - www.mipodcaster.com
---
Send in a voice message: https://anchor.fm/nachiket-satish-kshire/message
Jun 19, 2021
1 hr 8 min

आपल्यापैकी बऱ्याच लोकांना दूरदर्शन आणि आकाशवाणी चा काळ आठवत असेल.
त्या वेळेस माहिती प्रसारणावर काही मूठभर लोकांचं नियंत्रण असायचं, आधी सरकारचं नंतर काही मोठ्या कॉर्पोरेट news channel चं.
इंटरनेट आणि social media ह्या मुळे हे सगळं बदललं.
आता प्रत्येकाच्या हातात माहिती प्रसणार आलं आहे. आपण पॉडकास्ट, youtube, blog, फेसबुक पोस्ट, tweet अश्या कुठल्याही माध्यमातून घरी बसून माहिती प्रसारण करू शकतो.
पण निर्मिती सगळ्यांना करता येऊ लागली असेल तरी ह्याच्या फायद्यांपेक्षा धोके जास्त असतात, कारण एक fake news जगात कुठेही दंगली सुरु करू शकतात.
त्यामुळे निर्मिती करताना त्याच्या बरोबर येणाऱ्या responsibilities पण आपण जाणून घेतल्या पाहिजे.
social media चे फायदे आणि तोटे ; इतक्या वर्षात माहित प्रसारणात झालेले बदल ; online education, त्याचे फायदे, तोटे ; पॉडकास्ट चे भविष्य, अश्या
अनेक विषयांवर गप्पा मारल्या आहेत डॉ उज्ज्वला बर्वे ह्यांच्याशी.
डॉ उज्ज्वला बर्वे ह्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या communication & Journalism विभागाच्या प्रमुख आहेत, त्यांना विविध माध्यमातून काम करण्याचा अनेक दशकांचा अनुभव आहे, आणि ह्या क्षेत्रातला त्यांचं नावं खूप मोठं आहे.
त्यांचे स्वतःचे पण दोन पॉडकास्ट आहेत त्याची लिंक खाली दिली आहे
१) अनुस्वाद ( अनुवादित पुस्तकांवर आधारित पॉडकास्ट ) - https://open.spotify.com/show/1onyyMErK49kPzfHN1rANI?si=OEEApA7hSZqbuwRNNjVeZQ&dl_branch=1
२) माध्यम संशोधन संवाद ( communication & Journalism च्या विद्यार्थ्यांसाठी ) - https://open.spotify.com/show/1WrPHjNF6KgbKaTNdk98E5?si=y4Y4usMTQl2L8llkdBORNg&dl_branch=1
त्यांनी सांगितलेलं पुस्तक इथे विकत मिळेल - https://amzn.to/3pFIYZx
आमची website आहे - www.mipodcaster.com
---
Send in a voice message: https://anchor.fm/nachiket-satish-kshire/message
Jun 10, 2021
54 min

आजची आपली पाहुणी आहे अपूर्वा जोशी.
अपूर्वा ही एक फोरेन्सिक अकाऊंटंट आहे.
तिचं काम आहे समाजातील उचभ्रू, पॉवरफुल, श्रीमंत आणि हुशार अश्या लोकांनी केलेले आर्थिक घोटाळे शोधून काढणे, आणि त्याचे न्यायालयात मांडता येतील असे पुरावे सादर करणे.
हे सगळं netflix वर खूप ग्लॅमरस वाटत असेल, पण खऱ्या आयुष्यात प्रचंड मोठ्या ढिगाऱ्यातून, म्हणजे आता अर्थात डिजिटल ढिगाऱ्यातून सुई शोधण्यासारखं हे काम खूप मेहनतीचं, प्रचंड चिकाटिच आणि अतिशय चौकस बुद्धीच आहे.
अश्या ह्या क्षेत्रात एका मुलींनी येणं खुपच प्रेरणादायी आहे.
घोटाळे शोधून काढण्याबरोबरच ते होऊच नये ह्या साठी प्रेव्हेंटिव्ह आणि शैक्षणिक कामही अपूर्वा आणि तिची संस्था करते.
अश्या क्षेत्रात काम करायचे फायदे , challenges काय ?
कोणते कौशल्य आणि mindset लागतो ?
मुलींनी अश्या क्षेत्रात काम करावे का?
तिच्या कारकिर्दीतल्या इंटरेस्टिंग केसेस बद्दल माहिती
अश्या अनेक विषयांवर गप्पा केल्या आहेत डॉ अपूर्वा जोशी हिच्याशी, इन्स्पिरेशन कट्टाच्या ३७व्या भागात.
त्यांची website आहे - https://riskprolearning.com/
त्यांनी suggest केलेला पुस्तकं इथे मिळेल - https://amzn.to/3oZClAR ( इंग्लिश ) ; https://amzn.to/3vuOvEv ( मराठी अनुवाद)
आमची website आहे - www.mipodcaster.com
---
Send in a voice message: https://anchor.fm/nachiket-satish-kshire/message
May 29, 2021
54 min

स्ट्रेस म्हणजे ताण प्रत्येकाला असतो. तो दोन प्रकारचे असतात, सकारात्मक आणि नकारात्मक. सकारात्मक ताण हा आपल्या प्रगती साठी चांगला असतो, तर नकारात्मक ताण आपल्या शरीरासाठी आणि मनासाठी वाईट.
मग हा नकारात्मक ताण कसा कमी करायचं, किन्हां तो यायलाच नको ह्या साठी काय उपाय आहेत.
आपले विचार, आपलं अन्न ह्या सगळ्याचा आपल्या शरीरातील उर्जानशी काय संबंध असतो.
रेकी सारख्या तत्वांचा ह्या सगळ्यासाठी कसा उपयोग होतो.
रेकी मागचं शास्त्र काय आहे?
अश्या अनेक विषयांवर गप्पा केल्या आहेत, इन्स्पिरेशन कट्टा च्या ह्या 36व्या भागात प्राची देशपांडे ह्यांच्याशी, ज्या एक स्ट्रेस management एक्स्पर्ट आणि रेकी मास्टर आहेत. त्यांनी ह्या विषयांवर अनेक पुस्तकं पण लिहिली आहेत ....
प्राची देशपांडे ह्यांनी रेकमेंड केलेलं पुस्तक तुम्ही इथे खरेदी करू शकता - https://amzn.to/3f8BbQe
प्राची देशपांडे ह्यांनी लिहिलेलं पुस्तक इथे विकत मिळेल - https://amzn.to/3bEwXxJ, https://amzn.to/3ynnTXP , https://amzn.to/3hJbWWA
प्राची देशपांडे ह्यांची website आहे - www.prachideshpande.com
आमची website आहे - www.mipodcaster.com
---
Send in a voice message: https://anchor.fm/nachiket-satish-kshire/message
May 21, 2021
47 min

निकेत करजगी हे एक executive coach आहेत. त्यांनी आता पर्यंत २लाख पेक्षा जास्त लोकांना ट्रैनिंग दिला आहे. २००० तास पेक्षा जास्त कॉन्टेन्ट त्यांच्या कडे तयार आहे.
आजच्या ह्या गप्पांमध्ये खूप छान गोष्टी शिकायला मिळाल्या, एक म्हणजे आपला passion area शोधा, तो कसा शोधायचा त्या साठी टिप्स ह्या एपिसोड मध्ये दिल्या आहेत. त्यात काम करा आणि तत्यातून पैसे कमवा.
passion कसं शोधावं, आपला वेगळेपणा किती महत्वाचा असतो, आजच्या अनिश्चिततेच्या युगात काय करायला हवं, अश्या अनेक विषयांवर गप्पा केल्या आहेत इन्स्पिरेशन कट्टा च्या ह्या ३५व्या भागात..
आमच्या website www.mipodcaster.com ह्या वर भेट देऊन तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा.
You can buy the book recomanded by the guest here - https://amzn.to/3vTrjzo
---
Send in a voice message: https://anchor.fm/nachiket-satish-kshire/message
May 10, 2021
58 min

मधुराज रेसिपी हे नाव youtube वर असण्याऱ्या मराठी माणसांनी ऐकलं नाही ह्याची शक्यता फारच कमी आहे, त्यांच्या यशा मागची गोष्ट पण अनेकांनी ऐकली असेल. आज मधुराजींशी झालेल्या ह्या गप्पान मध्ये एक खूप महत्वाची गोष्ट शिकायला मिळाली, त्या म्हणतात, स्वप्न बघा, ते पूर्ण करायला मनापासून प्रयत्न करा, पण फ्लेक्सिबल राहा, रिजिड नको असायला. कधी detour घायची गरज पडली तर तो घ्या. कन्टेन्ट च्या बाबतीत पण फ्लेक्सिबल असायला हवं . उदाहरण म्हणजे, त्यांचं vision आहे पारंपरिक मराठी पदार्थ जगासमोर आणायचे, पण प्रत्येक वेळेस प्रेक्षकांना ते बघायला आवडतील असं नाही, सो कधी मराठी, कधी ज्याला डिमांड आहे अशे पदार्थ त्या टाकून balance maintain करतात.
Please visit www.mipodcaster.com and give us your feedback about the podcast.
---
Send in a voice message: https://anchor.fm/nachiket-satish-kshire/message
May 3, 2021
37 min

आपलं passion कसं शोधावं ? passion सापडणं हे शेवट आहे की सुरवात ? सतत शिकतं का राहावं ? कोणत्या विषयाचं training घ्यावं ? coach कसा select करावा ? अश्या विषयांवर बोललॊ आहे इन्स्पिरेशन कट्टाच्या ३३व्या भागात मकरंद रेगे ह्यांच्याशी.
मकरंद रेगे हे सिद्धार्थ लेअर्निंग सिस्टिम चे संस्थापक आहेत आणि २००१ पासून ते ट्रैनिंग आणि कोअचिंग क्षेत्रात काम करतात आहे . मार्शल गोल्डस्मिथ ह्या जगविख्यात coach कडून त्यांनी ट्रैनिंग घेतलं आहे आणि त्यांच्या तत्वावर ते काम करतात. अक्षयपात्रा ह्या जगविख्यात NGO सोबत काम करण्याचा अनुभव पण त्यांच्या पाठीशी आहे.
त्यांची website आहे - www.makrege.com आहे.
त्यांनी सांगितलेले पुस्तक - https://amzn.to/3sQNKDq इथे मिळू शकतं
आमची website आहे www.mipodcaster.com ह्या वर भेट देऊन प्रतिक्रिया नक्की कळवा.
How to find your passion? Is finding passion the ultimate thing? Why to keep yourself updated with the latest knowledge ? How to choose a training program? How to choose a coach? spoke to these and other topics on the 33rd episode of Marathi podcast Inspiration Katta with Makarand Rege.
Makarand Rege is the founder of Siddharth Learning Systems. He has been in the training and coaching field since 2001. He is coached by Marshall Goldsmith. He also has amazing experience of working with world class NGO Akshaya Patra.
His website is www.makrege.com
Book suggested by him can be bought - https://amzn.to/3sQNKDq
Our website - www.mipodcaster.com, please visit and give your feedback.
---
Send in a voice message: https://anchor.fm/nachiket-satish-kshire/message
Apr 29, 2021
50 min

उद्योजक आणि व्यावसायिक ह्यात फरक आहे.
समाजाला कशाची गरज आहे हे शोधणे, त्या साठी एखाद्या गोष्टीची मागणी नसेल तरी एखादी वस्तू किंवा सेवा उपलब्ध करून देणे,
त्यासाठी लोकांमध्ये जागरूकता तयार करणे, त्यातून त्या वस्तू/सेवा ह्यासाठी मागणी तयार करणे. हे सगळं उद्योजक करत असतात.
आपल्या देशात व्यावसायिक असतात पण उद्योजक नसतात असा साधणार चित्र दिसतं.
समीर आणि त्याच्या टीम ने मराठी पुस्तकं श्राव्य माध्यमांत आणण्याचे काम त्याची ट्रेंड नसतानाही २०११ मध्ये सुरु केलं.
हळू हळू snovel ह्या भारतीय श्राव्य माध्यमाची सुरवात झाली आणि आता ते आपल्या कक्षा उंचावण्याच्या तयारीत आहेत.
snovel ची सुरवात, सुरवातीच्या दिवसात आलेल्या अडचणी, श्राव्य माध्यम, content creation, त्याचं भविष्य ह्या सगळ्यवार गप्पा मारल्या आहेत
समीर धामणगावकर ह्याच्याशी आपल्या ३२व्या भागात.
There is a difference between an entrepreneur and a businessman.
An entrepreneur is the one who finds out exactly what is needed in the market, creates a product or service to serve that need, creates awareness about it and generates demand for the product and service.
In India entrepreneurship is not that common.
Sameer and his team started creating audio content in 2011 when there was not trend of audio content. Slowly Snovel was formed and now they are ready to change the orbits and go to the next level.
Spoke to Sameer Dhamangaonkar on How Snovel started, difficulties faced, challenges, future plans, content creation industry, scope in content creation and much more on 32nd episode of Inspiration Katta.
---
Send in a voice message: https://anchor.fm/nachiket-satish-kshire/message
Apr 19, 2021
1 hr 12 min

भारतात साधारण 30 कोटी लोकं youtube बघतात.. म्हणजे अमेरिकेच्या जवळजवळ संपूर्ण लोकसंख्येच्या बरोबरीचे youtube बघणारे लोक भारतात आहेत.. आणि jio आल्यावर ही संख्या प्रचंड वेगाने वाढते आहे..
मग एवढे लोक जिथे असतात तिथे त्याची स्वतंत्र economy तयार होणं हे स्वाभाविक आहे..
पण ही स्वतंत्र economy जरी असली आणि खूप fame आणि पैसे कमावण्याची इथे संधी असली तरी, ते अगदी झटपट कमावता येतात अशी अनेक लोकांची धारणा झाली आहे..
मग नक्की तथ्य काय आहे? खरच इतका scope इथे आहे का? त्या साठी काय करावं लागतं? सातत्याने कामं करण किती महत्त्वाचे असतं? Patiance किती आवश्यक आहे? ह्या आणि अनेक विषयांवर गप्पा मारल्या आहेत अभिनेत्री ते youtube star असा प्रवास करणाऱ्या उर्मिला निंबाळकर हिच्याशी इन्स्पिरेशन कट्टा च्या 31व्या भागात
---
Send in a voice message: https://anchor.fm/nachiket-satish-kshire/message
Apr 9, 2021
1 hr 28 min
Load more
