
भाऊंनी समाधानाने आपली कथा सांगून पूर्ण केली. जिद्द आणि चिकाटीने एवढं यश संपादन करुनही भाऊंनी आपल्यातला साधेपणा कधीही सोडला नाही. ही बिकट वाट म्हणूनच ते यशापर्यंत नेऊ शकले.
Bhau concluded the narration of his story. Even after achieving great success with his sheer determination and perseverance, Bhau never let go of his simplicity. That’s why he could reach the pinnacle of success even after facing numerous hardships.
Jun 5, 2023
33 min

व्यवसायाचा पसारा वाढत गेला तशी भाऊंनी जबाबदारीची विभागणी करायला सुरुवात केली. यथावकाश नातवंडेही व्यवसायात आली आणि त्यांनी प्रगतीच्या नव्या वाटा शोधल्या.
As the business expanded, Bhau started delegating responsibilities. With time, his grandchildren also entered the business and found new ways to take the business forward.
Jun 5, 2023
27 min

भाऊंना शेतीची विशेष आवड. निसर्गात रमणं हाच त्यांचा छंद. भाऊंचं आणि निसर्गाचं हे जवळचं नातं निर्व्याज आनंदाचं प्रतीक आहे.
Bhau was extremely fond of agriculture. He loved being in nature. His special connection with nature is a symbol of extreme bliss.
Jun 5, 2023
15 min

स्वतःसाठी कधीच काही न करता कायम कुटुंबासाठी कष्ट उपसणार्या भाऊ व बाईंनी आपल्या आनंदासाठी केलेला परदेश दौरा! पर्यटन करतानाही आपली निरिक्षणशक्ती जागृत ठेवून भाऊंनी त्या प्रवासाचा आस्वाद घेतला.
After always keeping their family’s interests ahead of them and after a lifetime of working hard for the family, Bhau and Bai finally go on an international trip for their own happiness. Even while travelling, the observer in Bhau stayed alive and he enjoyed the trip in his unique way.
Jun 5, 2023
30 min

भाऊंनी कायम सर्व परिवाराला सांभाळलं, जपलं आणि आपलेपणाने मदत केली. परिवारातल्या सर्वांनी सांगितलेल्या या भाऊंच्या आठवणी भाऊंचा स्वभाव, त्यांची ध्येयनिष्ठा समजून घेण्यासाठी आवश्यकच आहेत.
Bhau always took care of the entire family wholeheartedly. From the memories shared by family members, we can learn about Bhau’s nature and his devotion to duty.
Jun 5, 2023
39 min

प्रविण लोणचं ग्राहकांच्या पसंतीस उतरलं. यवतला कारखाना सुरु झाला. मालाची गुणवत्ता कायम राखण्याकडे भाऊ विशेष लक्ष देत होते. नावलौकिक वाढून ही उत्पादनं परदेशातही जाऊ लागली.
Pravin Pickles started getting appreciated by customers. A factory was started in Yavat. Bhau paid great attention to maintaining the quality of each and every product. The popularity of Pravin Pickles increased and they started exporting overseas.
Jun 5, 2023
40 min

भवानी पेठेतलं दुकान व नवीन फॅक्टरीची भागीदारी संपुष्टात आली. दोन पावलं मागं जावं लागलं तरी भाऊंचा निश्चय ठाम होता. बाईंच्या मनात लोणचं तयार करण्याची कल्पना आली आणि व्यवसायाला नवी दिशा मिळाली.
The shop in Bhawani Peth and the partnership in the new factory came to an end. Even after these setbacks, Bhau was determined to keep moving forward. Bai had the idea of creating pickle, which gave a new direction to the business.
Jun 5, 2023
36 min

रोज ३०० किलो मसाला उत्पादन सुरु झालं. भाऊ आता व्यावसायिक म्हणून वरच्या वर्तुळात ओळखले जाऊ लागले. स्वतःची मोटार घरी आली. मसाल्यांची फॅक्टरी उभारण्याचं स्वप्न भाऊ पाहू लागले.
As Bhau shifted his entire focus to the spices business, the sale went up. He started taking better care of his brothers and living up to his responsibilities. While happiness was making a way into their lives, Bhau had to deal with the untimely loss of his beloved father.
Jun 2, 2023
31 min

भाऊंनी पूर्ण लक्ष मसाल्यांच्या व्यवसायावर केंद्रित करताच मालाची विक्री वाढू लागली. भाऊबंदांची जबाबदारी आता भाऊ अधिक समर्थपणे निभावून नेऊ लागले. एकिकडे सुखाचे दिवस येत असतानाच आपलं पितृछत्र हरपल्याचं दुःखही भाऊंना सहन करावं लागलं.
As Bhau shifted his entire focus to the spices business, the sale went up. He started taking better care of his brothers and living up to his responsibilities. While happiness was making a way into their lives, Bhau had to deal with the untimely loss of his beloved father.
Jun 2, 2023
25 min

नोकरीच्या बरोबरीने विविध व्यवसाय करुन भाऊ पैसे कमवत होते. कष्टांचा विसर पडावा म्हणून सार्या कुटुंबासह भाऊ मुंबईला जाऊन आले. अखेरीस यशोमार्ग त्यांच्या दृष्टीपथात आला होता.
Bhau started doing small businesses in addition to his job. He took his entire family to Mumbai to forget the everyday sorrows. Finally, the road to redemption and success was in sight.
Jun 2, 2023
24 min
Load more
