Show notes
जानेवारी 2024 ला दावोसमध्ये झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रॉस घेब्रेयेसुस यांनी भविष्यात कोरोनापेक्षा गंभीर आजाराची साथ येऊ शकते असा इशारा दिलाय. 'Disease X' म्हणजे नेमकं काय? यामुळे आणखीन एक जागतिक साथ येऊ शकते का? आणि भविष्यात असा रोग आलाच तर त्यासाठी काय तयारी केली जात आहे? पाहुयात सोपी गोष्टच्या या भागात.
लेखन - आशय येडगे निवेदन – सिद्धनाथ गानूएडिटिंग – निलेश भोसले
