Show notes
2023च्या पावसाळ्यात काही आठवडे धोधो पाऊस कोसळला, पण मग पावसाने अशी काही दडी मारली की शेतंच्या शेतं कोरडी ठक्क पडली. धरणांचा साठा पुरेल की नाही, गुरांचं काय होणार, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, दुष्काळ पडला तर शेतीचं काय, हे सगळं प्रश्न आ वासून उभे आहेत. पण दुष्काळ कसा ठरवतात? तो कोण जाहीर करतं? आणि दुष्काळ जाहीर करण्यात सरकार टाळाटाळ करतंय, असे आरोप नेहमी का होतात, याबद्दल बोलणार आहोत. मी सिद्धनाथ, तुम्ही पाहताय बीबीसी मराठीची सोपी गोष्ट.
संशोधन – आशय येडगे
निवेदन – सिद्धनाथ गानूएडिटिंग – अरविंद पारेकर
