Show notes
भारताचं चंद्रयान तर चंद्रावर पोहोचलंय. आता ते तिथून त्याचं लँडर रोव्हर काय माहिती, काय फोटो पाठवतंय, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. पण हो, तिथून आपल्याला काही माती किंवा खडक आत्ताच आणता येणार नाही. कारण त्यासाठी पृथ्वीवर परत येण्याचीही सोय करावी लागते.
पण मग जर चंद्रावर एक यान लँड करणं जर इतकं कठीण असेल, तर कल्पना करा ना, चंद्रावरून तेच यान पृथ्वीवर कसं आणलं जात असेल? आणि म्हणूनच गेल्या 50 वर्षांत कुणी चंद्रावर जाऊन परत नाही आलंय का? पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये. लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकरएडिटिंग – अरविंद पारेकर
