Show notes
नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात आलेल्या एकूण 20 चित्त्यांपैकी एकापाठोपाठ एक 9 चित्त्यांचे मृत्यू झालेत. इथे चार बछड्यांना जन्मही दिला, पण त्यापैकीही तीन दगावले. यासाठी कुणी या चित्त्यांच्या मानेभोवती लावलेल्या रेडिओ कॉलरला दोष देतंय तर कुणी वातावरणाला. खरंच या चित्त्यांचे मृत्यू का होतायत? आणि ते रोखायला भारताने काय करायला हवं? पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये.
लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकरएडिटिंग – अरविंद पारेकर
