Show notes
तुम्ही कधी ऑनलाईन गेम्स खेळले आहेत का? म्हणजे असे ऑनलाईन फँटसी गेम्स, जे Dream 11, MPL, Rummy Circle, A23, PokerBaazi सारख्या ॲप्सवर खेळले जातात. जर हो, तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे.
सरकारने आता यावर 28 टक्के GST लावला आहे. 10 जुलैला GST काउंसिलच्या 50व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याचा फटका नेमका कुणाला आणि कसा बसेल? समजून घेऊ या वार्तांकन - निखिल इनामदार आणि हिमांशु भयाणीलेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकरएडिटिंग – अरविंद पारेकर
