Show notes
काही फरक सोडले तर थ्रेड्स ॲप ट्विटरसारखंच आहे हे आपण पाहतोय. थ्रेड्स ट्विटरशी मैत्रीपूर्ण स्पर्धा करेल असंही मेटाच्या टॉप मॅनेजमेंटने म्हटलंय. पण ट्विटरला ही गोष्ट रुचलेली नाही. मेटाविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा विचारही ट्विटरच्या मॅनेजमेंटने बोलून दाखवलाय. इलॉन मस्कने म्हटलं की “स्पर्धा ठीक आहे पण फसवणूक नाही.”
लेखन - निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - अरविंद पारेकर
