Show notes
जगभरात 14 जून हा दिवस 'जागतिक रक्तदान दिन' म्हणून साजरा केला जातो. या दिवशी रक्तदानाची गरज, त्याचं महत्त्व आणि फायदे याबद्दल लोकांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न केला जातो.
रक्तदान करण्यासाठी काही विशिष्ट बाबींची पूर्तता करणं आवश्यक असतं. जागतिक आरोग्य संघटना आणि राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेनं (NACO) यासाठीच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. रक्तदानाविषयी 6 मुद्द्यांमध्ये समजून घेऊया.लेखन - टीम बीबीसी मराठी
निवेदन - गुलशनकुमार वनकरएडिटिंग - निलेश भोसले
