Show notes
मुलांनी फोन्स - टॅब्स वापरण्याचं प्रमाण आता वाढलंय. कधी गेमिंग, कधी व्हीडिओज - सोशल मीडियाचा टाईमपास किंवा मग ऑनलाईन शाळा - क्लास - अभ्यास यासाठीसुद्धा.
मग ती नेमकं काय पाहतायत, ऑनलाईन काय करतायत यावर बारीक लक्ष देणं पालकांसाठी अशक्य.मग तुमच्या मुलांची ऑनलाईन प्रायव्हसी जपण्यासाठी, ऑनलाईन जगातल्या धोक्यांपासून त्यांना दूर ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो? जाणून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये.लेखन - निवेदन - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – अरविंद पारेकर
