Show notes
राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना ड्रोन हल्ल्याने मारण्याचा युक्रेनने प्रयत्न केला, असा आरोप रशियाने केलाय. मात्र युक्रेनने हा आरोप फेटाळलाय.
पण वर्षभरापासून युद्धात अडकलेल्या दोन देशांमध्ये तणाव आणखी वाढलाय. नेमकं काय घडलंय?रशियन राष्ट्राध्यक्षांवर खरंच असा हल्ला होऊ शकतो का? हे सगळं रशियानेच घडवून आणलं असेल अशी शंका का घेतली जातेय? आणि यामुळे रशिया युक्रेन युद्धाचा पुढचा गिअर टाकला जाईल का? पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये. लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकरएडिटिंग – शरद बढे
