Show notes
2015मध्ये पहिल्यांदा कोकणात एका मोठ्या रिफायनरीचा प्रस्ताव आला. ही 'जगातली सर्वांत मोठी रिफायनरी' असेल, अशी घोषणा करण्यात आली.
पण या प्रकल्पासाठी जमीन संपादित करायला जेव्हा सुरुवात झाली, तेव्हा स्थानिकांनी याला विरोध सुरू केला. या प्रकल्पाने पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील अशा कोकणात निसर्गाचा ऱ्हास होईल, मच्छीमारांचं नुकसान होईल, अशी भीती स्थानिकांनी वर्तवली.नंतर उद्धव ठाकरेंच्या सरकारने हा प्रकल्प रत्नागिरीमधल्याच बारसूमध्ये होईल, अशी घोषणा केली. आता तिथेही लोक रस्त्यावर उतरलेत.काय आहे हा रिफायनरीचा प्रकल्प? या प्रकल्पाची गरज काय? आणि त्याला एवढा विरोध का होतोय? समजून घेऊ या सर्व बाजू आजच्या सोपी गोष्टमध्ये. वार्तांकन – टीम बीबीसीलेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकरएडिटिंग – अरविंद पारेकर
