Show notes
जम्मू काश्मिरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना त्या राज्यातल्या कथित रिलायंस इन्श्यूरन्स घोटाळ्याप्रकरणी सीबीआयनं चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे, जाणून घेऊयात.
काही दिवसांपूर्वीच द वायर या न्यूज वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमुळे सत्यपाल चर्चेत आले होते. मोदींचे निकटवर्तीय असलेले लोक दोन फाईल्स पास करण्यासाठी लाच देऊ इच्छित होते, असा मलिक यांचा दावा आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे?संशोधन – अभिनव गोयल
निवेदन – जान्हवी मुळेएडिटिंग – अरविंद पारेकर
