सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
सुदानमध्ये संघर्ष का होतो आहे? 5 प्रश्न, 5 उत्तरं
6 minutes Posted Apr 20, 2023 at 7:10 am.
0:00
6:57
Download MP3
Show notes

सुदानमध्ये सध्या देशाचं लष्कर आणि निमलष्करी दल एकमेकांसमोर उभे ठाकलेत.

सुदान ईशान्य आफ्रिकेतला एक मोठा देश. इथल्या साडेचार कोटींपेक्षा जास्त लोकसंख्येत मुस्लीम बहुसंख्य आहेत. पण सुदान जगातल्या सर्वांत गरीब देशांपैकी एक आहे.

राजधानी खार्तूममध्ये 15 एप्रिलपासून सुदानी लष्कर आणि निमलष्करी दलात संघर्ष पेटलाय. या संघर्षात जोरदार गोळीबार, हवाई हल्ले होतायत, अनेक निष्पाप बळी जातायत. फक्त सुदानीच नाही इतर देशांचेही लोक तिथे अडकलेत.